शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

किडनी तस्करी: दोन भावंडांच्या आत्महत्या प्रकरणात अखेर पुण्यातील डॉक्टरवर गुन्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:30 IST

अखेर या प्रकरणात बार्शीटाकळी पोलिसांनी पुण्यातील डॉ. डेव्हीड जमई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

अकोला: बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा येथील अतुल मोहोड याने किडनी तस्करी रॅकेटच्या दबावाखाली येऊन विषारी औषध प्राशन करून १७ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत डॉ. डेव्हीड जमई याने आर्थिक फसवणूक केल्याचे म्हटले होते. अखेर या प्रकरणात बार्शीटाकळी पोलिसांनी पुण्यातील डॉ. डेव्हीड जमई याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांची चमू पुण्यातील मृतक अतुल रूमवरसुद्धा जाऊन आले.अतुल अजाबराव मोहोड (२६) आणि त्याचा चुलत भाऊ धीरज संतोष मोहोळ (२६) हे दोघे एकाच कंपनीत कामाला होते. यापैकी धीरजने २६ जुलै रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. त्यानंतर दोन महिन्यांनी अतुल मोहोड याने १७ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी ११ आॅगस्ट ते १६ सप्टेंबर दरम्यान डॉ. डेव्हीड जमईसोबत अतुल मोहोड याचे व्हॉट्सअ‍ॅपवरून झालेले चॅटिंग पोलिसांनी तपासले. या चॅटिंगनुसार अतुलची डॉ. डेव्हीड याने दोन लाखांनी फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. डॉ. डेव्हीडने त्याच्याकडे दुसरा किडनी देणारा व्यक्ती तयार आहे, असे सांगितल्यावर अतुल मोहोड याने त्याला दिलेल्या दोन लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा डॉ. डेव्हीड याने पैसे परत करण्यास नकार दिल्यानंतर अतुल तणावात आला आणि त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणात बार्शीटाकळी पोलिसांनी डॉ. डेव्हीड जमई याच्याविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्यामुळे भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल केला.  पोलिसांची चमू पुण्यावरून परतलीआरोपी डॉ. डेव्हीड जमई याचा शोध घेण्यासाठी बार्शीटाकळी पोलिसांची एक चमू गुरुवारी पुण्याकडे रवाना झाली होती. या चमूने मृतक अतुल मोहोड जिथे राहत होता. त्या रूमची पाहणी केली असून, आवश्यक ते पुरावे गोळा केले. पोलिसांनी डॉ. डेव्हीडचा पुण्यात शोध घेतला; परंतु तो मिळून आला नाही.आरोपी दिल्ली येथील रुग्णालयात डॉक्टरमृतक अतुल मोहोड याने लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये डॉ. डेव्हीड जमई हा न्यू दिल्ली येथील साई रेसीडेन्सी बिल्डिंग नंबर १०८ मधील हॉस्पिटल मेमरी लेन येथे काम करीत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पोलीस त्याला अटक करण्यासाठी कोणती पावले उचलतात, डॉ. डेव्हीड याला अटक केल्यास पोलिसांना त्याच्याकडून किडनी तस्करीची मोठी माहिती मिळू शकते.

 

टॅग्स :AkolaअकोलाPuneपुणेdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी