बालसुधार गृहातील मुलाला पळविले

By Admin | Updated: January 31, 2015 00:42 IST2015-01-31T00:42:47+5:302015-01-31T00:42:47+5:30

बालसुधार गृहातील मुलाला अज्ञात व्यक्तीने पळविले;गुन्हा दाखल.

The kidnapper escaped the boy in the house | बालसुधार गृहातील मुलाला पळविले

बालसुधार गृहातील मुलाला पळविले

अकोला: बालसुधार गृहातील मुलाला गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याप्रकरणी खदान पोलिसांनी शुक्रवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास गुन्हा दाखल केला. गोरक्षण रोडवरील माधवनगरातील शासकीय मुलांच्या निरीक्षणगृहाच्या अधीक्षिका माधवी मोरे यांच्यातर्फे कर्मचारी शोभा यशवंत तायडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, बालसुधार गृहातील बारकू दत्तू पवार(१७ रा. उकळीसुकळी जि. बुलडाणा) हा घरफोडीच्या गुन्हय़ामधील बालगुन्हेगार असून, त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार बालसुधार गृहात पाठविण्यात आले होते. २९ जानेवारी रोजी सायंकाळच्या दरम्यान सुधारगृह परिसरातून त्यास अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. तायडे यांच्या तक्रारीनुसार खदान पोलिसांनी भादंविच्या कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला.

Web Title: The kidnapper escaped the boy in the house