खेट्री-चतारी रस्त्याची चाळणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:20 IST2021-05-27T04:20:20+5:302021-05-27T04:20:20+5:30

खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री-चतारी ३ किलोमीटर रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून चाळणी झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक ...

Khetri-Chatari road sieve | खेट्री-चतारी रस्त्याची चाळणी

खेट्री-चतारी रस्त्याची चाळणी

खेट्री : पातूर तालुक्यातील खेट्री-चतारी ३ किलोमीटर रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून चाळणी झाली असून, रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने अनेक वेळा अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. मोठमोठे खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून खेट्री-चतारी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पातूर तालुक्यातील खेट्री-चतारी हा मार्ग रहदारीचा असून, या मार्गाने वाहनांची वर्दळ असते. अकोला, वाडेगाव, पातूर येथील बाजारपेठेत जाण्यासाठी परिसरातील ३० ते ४० खेड्यांचा हा प्रमुख रस्ता आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने वाहनचालक त्रस्त झाले असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Khetri-Chatari road sieve