अकोला तालुक्यात कौलखेड नवे महसूल मंडळ जाहीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:31 IST2017-12-17T23:37:18+5:302017-12-18T00:31:13+5:30
अकोला : अकोला तालुक्यात कौलखेड नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात येत असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जाहीर केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे आक्षेप दाखल करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे.

अकोला तालुक्यात कौलखेड नवे महसूल मंडळ जाहीर!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला तालुक्यात कौलखेड नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात येत असल्याची अधिसूचना जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जाहीर केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांकडे आक्षेप दाखल करण्याची मुदत १५ फेब्रुवारीपर्यंत आहे.
अकोला तालुक्यात ११ महसूल मंडळ होते. त्यामध्ये नवीन तलाठी साझाची वाढ झाल्याने तालुक्यात एक नवीन कौलखेड महसूल मंडळ स्थापन करण्याची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. नवीन महसूल मंडळ पुनर्रचनेबाबत हरकती किंवा सूचना असल्यास नागरिकांनी १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे यासंदर्भात हरकती व सूचना दाखल कराव्या, असे जिल्हाधिकार्यांमार्फत कळविण्यात आले आहे.