शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

‘वान’च्या जलसाठय़ावर काथ्याकूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:58 IST

अकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीसाठी शासनाने २५४ कोटींचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जलवाहिन्यांचे जाळे टाकणे, जलकुंभ उभारण्याचा समावेश असून, दुसर्‍या टप्प्यात वान धरणातील जलसाठय़ाचा पर्याय दिला आहे. तांत्रिक सल्लागार असणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने वान धरणासंदर्भात प्रस्ताव तयार केला असला, तरी धरणातील जलसाठय़ाची उचल व आरक्षणावर पाटबंधारे विभागाने हरकत घेतल्याची माहिती आहे. याविषयी बुधवारी महापालिका, मजीप्रा व पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांच्या बैठकीत खलबते झाली. 

ठळक मुद्देजलसंकट : महापालिका, मजीप्रा अन् पाटबंधारे विभागात खलबतेपाण्याची उचल, आरक्षणाचा गुंता

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : ‘अमृत’ योजनेंतर्गत शहरातील पाणीपुरवठा वितरण प्रणालीसाठी शासनाने २५४ कोटींचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला. योजनेच्या पहिल्या टप्प्यात जलवाहिन्यांचे जाळे टाकणे, जलकुंभ उभारण्याचा समावेश असून, दुसर्‍या टप्प्यात वान धरणातील जलसाठय़ाचा पर्याय दिला आहे. तांत्रिक सल्लागार असणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने वान धरणासंदर्भात प्रस्ताव तयार केला असला, तरी धरणातील जलसाठय़ाची उचल व आरक्षणावर पाटबंधारे विभागाने हरकत घेतल्याची माहिती आहे. याविषयी बुधवारी महापालिका, मजीप्रा व पाटबंधारे विभागातील अधिकार्‍यांच्या बैठकीत खलबते झाली. केंद्र शासनाच्या ‘अमृत’ योजनेंतर्गत शहराच्या पाणीपुरवठा योजनेत सुधारणा करणे, दुसर्‍या टप्प्यात भूमिगत गटार योजना कार्यान्वित करणे आणि पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी विविध भागात ‘ग्रीन झोन’ची निर्मिती करण्याचा समावेश आहे. पाणीपुरवठा योजना आणि भूमिगत गटार योजनेसाठी राज्य शासनाने ‘डीपीआर’ तयार करणे व तांत्रिक सल्लागार म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली. मजीप्राने शहराच्या पाणीपुरवठा वितरण प्रणालीसाठी शासनाकडे २५४ कोटींचा प्रस्ताव सादर केला. यापैकी शासनाने ११0 कोटी रुपये मंजूर केले. यामध्ये महान ते अकोलापर्यंतची ९00 व्यासांची मुख्य जलवाहिनी बदलणे, शहरात नवीन जलवाहिनीचे जाळे टाकणे, विविध भागात आठ जलकुंभांची उभारणी करण्याचा समावेश आहे. महापालिका क्षेत्राची झालेली हद्दवाढ, भविष्यातील वाढती लोकसंख्या पाहता महान धरणातील जलसाठय़ाचे आरक्षण कमी पडण्याची शक्यता आहे. ही बाब गृहित धरून ‘अमृत’ योजनेत दुसर्‍या टप्प्यात वान धरणातील जलसाठय़ाचा अंतर्भाव करण्यात आला आहे. मध्यंतरी महापालिका व मजीप्राच्यावतीने वान धरणातील जलसाठय़ाचा प्रत्यक्षात आढावा घेऊन वान येथील कॅनॉलची प्रत्यक्षात पाहणी करण्यात आली होती. यासंदर्भात तांत्रिक सल्लागार म्हणून जबाबदारी असलेल्या मजीप्राने सकारात्मक प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुषंगाने वान धरणातील जलसाठा, पाणीपुरवठय़ाच्या योजनांसह शेतीसाठी आरक्षित केलेला जलसाठा यावर महापालिका, मजीप्रा व पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाल्याची माहिती आहे. 

पाण्याची उचल, आरक्षणाचा गुंतावान धरणातून जलसाठय़ाची उचल करून ते अकोट फैलपर्यंत आणण्याचा प्रस्ताव आहे. परंतु ही उचल थेट धरणातून करायची किंवा कॅनॉलद्वारे, यावर महापालिका व पाटबंधारे विभागाचे एकमत झाले नसल्याची माहिती आहे. धरणातून शेगाव, अकोट येथे पाणीपुरवठा केला जातो. तसेच सिंचनासाठी पाण्याचे आरक्षण पाहता अकोला शहरासाठी जलसाठय़ाच्या आरक्षणाची तरतूद होऊ शकते किंवा नाही, यावर गुंता निर्माण झाल्याची माहिती आहे. अकोलेकरांची तहान भागविण्यासाठी प्रशासन काय उपाययोजना करते, याकडे लक्ष लागले आहे.