अर्थसंकल्पातील तरतुदीवरून काथ्याकूट!

By Admin | Updated: March 18, 2016 02:14 IST2016-03-18T02:14:18+5:302016-03-18T02:14:18+5:30

आज स्थायी समितीची सभा; अकोला महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्याच्या हालचालींना वेग.

Kathakakut from the budgetary provisions! | अर्थसंकल्पातील तरतुदीवरून काथ्याकूट!

अर्थसंकल्पातील तरतुदीवरून काथ्याकूट!

अकोला: महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. मार्च महिना संपण्यास काही दिवसांचा अवधी असला तरी बजेटमधील तरतुदींवर प्रशासनात चांगलाच काथ्याकूट सुरू आहे. यासंदर्भात स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी अंदाजपत्रकाच्या विषयावर सभेचे आयोजन केले असून, दुरुस्त्या सुचवल्या आहेत. या सभेत प्रशासन काय भूमिका मांडते, याकडे लक्ष लागले आहे.
केंद्रासह राज्य व महापालिकेत भाजप-शिवसेनेची सत्ता आहे. शहराच्या विकासासाठी ह्यअमृतह्ण योजना, पंतप्रधान आवास योजना, ह्यस्वच्छ महाराष्ट्र अभियानह्णअंतर्गत शौचालय उभारणीसह कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त होत आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शहरासाठी निधी प्राप्त होण्याची ही पहिलीच वेळ असून, या निधीचे योग्य विनियोजन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. रस्ते, नाल्या, पथदिव्यांसह सार्वजनिक स्वच्छतागृह आदी कामांसाठी प्राप्त निधीतून होणारी कामे दज्रेदार व्हावीत, ही अकोलेकरांची रास्त अपेक्षा आहे. दज्रेदार कामांसाठी महापालिका आयुक्त अजय लहाने आग्रही असून त्या दिशेने प्रशासनाची वाटचाल सुरू आहे. अशा स्थितीत मनपा कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनाच्या समस्येवर उपाय शोधण्यासाठी ठोस उत्पन्नाचे पर्याय स्वीकारावे लागतील. या सर्व बाबींचे काटेकोरपणे नियोजन करून नगरसेवकांना भेडसावणार्‍या समस्या सोडवण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करावी लागेल. या सर्व विषयांवर चर्चा करून निधीची तरतूद करण्यासाठी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी १८ मार्च रोजी स्थायी समिती सभागृहात सभेचे आयोजन केले आहे.

Web Title: Kathakakut from the budgetary provisions!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.