शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील कन्येचे 'कस्तुरी'ने केले थाटात लग्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:24 PM

येथील कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीने मोलमजुरी करणाºया कुटुंबातील कन्येच्या लग्नासाठी पुढाकार घेतला.

अकोला: लग्न म्हटले की, तीन-चार लाख रुपये खिशात हवेच. त्यात मुलीचे लग्न म्हटले तर वधूपित्याची मोठी अडचण होते. लग्नासाठी एवढा पैसा आणायचा कोठून, असा प्रश्न अनेक गोरगरीब कुटुंबातील पित्यांना पडतो. अशा परिस्थितीत कुणी मदतीचा हात दिला तर वधूपित्याच्या डोक्यावरचा मोठा भार कमी होतो. येथील कस्तुरी चॅरिटेबल सोसायटीने मोलमजुरी करणाºया कुटुंबातील कन्येच्या लग्नासाठी पुढाकार घेतला. खर्चाची, पाहुण्यांच्या स्वागताची, भोजनाची संपूर्ण जबाबदारी कस्तुरीने उचलून या कन्येचे १२ मे रोजी थाटात लग्न लावून दिले आणि सामाजिक बांधीलकीचा आदर्श घालून दिला.ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या माध्यमातून तळेगाव बाजार येथील भूमिहीन व मोलमजुरी करणारे रामदास सोनोने हे ‘कस्तुरी’ या सेवाभावी संस्थेच्या संपर्कात आले. त्यांची पत्नी चित्रातार्इंची हृदय शस्त्रक्रिया मुंबईला झाली होती. त्यासाठीही कस्तुरीने आर्थिक मदतीचा हात दिला. एवढेच नाही तर त्यांची सुकन्या दुर्गाच्याही शिक्षण, रोजगार व विवाहाची जबाबदारी कस्तुरीने स्वीकारली. वाणिज्य शाखेची पदवीधर असलेल्या दुर्गाचा अमरावती येथील आशीष वडाणे यांच्यासोबत विवाह जुळला. आशीष वडाणे हे सेन्ट्रल बँकेत कार्यरत आहेत. दोन्ही परिवाराच्या संमतीने १२ मे रोजी कस्तुरीच्या गायगाव मार्गावरील परिसरावर या दोघांचा विवाह सोहळा थाटात पार पडला. विवाह सोहळ्यात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी भर उन्हात सुमारे ७०० नागरिकांनी हजेरी लावली. कस्तुरीने दुर्गासारख्या मुलीच्या आयुष्यात आनंदच निर्माण केला नाही तर पालकाची भूमिका बजावून तिच्या कुटुंबाला मदतीचा हात दिला. कस्तुरीचे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.  

विवाह सोहळ्याला मान्यवरांची हजेरी!विवाह सोहळ्याला माजी आ. वसंतराव खोटरे, डॉ. अशोक ओळंबे, सोनू देशमुख, मोहन महाराज गोंडचवर, सुभाष लोहे, हेमंत जवादे (नागपूर), डॉ. नानासाहेब चौधरी, सोमेश्वर पेठकर, साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळ मोठी उमरी, कस्तुरीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. किशोर बुटोले, उपाध्यक्ष यशवंत देशपांडे, डॉ. विद्या राऊत, वंदना कुळकर्णी, मीरा देशपांडे, कविता राठोड, शीला गहिलोत, डॉ. शांताराम बुटे, डॉ. रोहिणी तडस, सहसचिव प्रा. मेघा कनकेकर, अमर शर्मा, संजय ठाकरे, शारदा शर्मा, संजय गायकवाड, राजू पेठकर, दमोदर नुपे, चेतना आनंदाणी, सुहास पातुर्डे, कैलास शर्मा, ममता शर्मा, दीपक वाघमारे, संजय बुटोले, जयंत जोशी, सुनील मिटकरी, अतुल कुळकर्णी, पंडित पळसपगार आदींनी हजेरी लावली.

 

टॅग्स :Akolaअकोलाsocial workerसमाजसेवक