कपाशी, सोयाबीनवर अज्ञात रोग
By Admin | Updated: August 3, 2014 00:34 IST2014-08-03T00:34:16+5:302014-08-03T00:34:16+5:30
दोन्ही पिकांना अज्ञात रोगाने ग्रासल्याने शेतकरी स्वत:च निर्णय घेऊन कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत.

कपाशी, सोयाबीनवर अज्ञात रोग
तेल्हारा : तालुका बागायती क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्या तेल्हारा परिसरातील शेतकर्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. पाऊस आल्यानंतर सोयाबीनची पेरणी केली. मात्र, या दोन्ही पिकांना अज्ञात रोगाने ग्रासल्याने शेतकरी स्वत:च निर्णय घेऊन कीटकनाशकाची फवारणी करीत आहेत. गतवर्षी अतवृष्टीमुळे शेतकर्यांचे पीक हातचे गेले, तर यावर्षी या तालुक्यात बागायती क्षेत्रात शेतकर्यांनी बँकेचे व सावकाराचे कर्ज काढून कपाशीची लागवड केली. पाऊस आल्यानंतर सोयाबीनची पेरणी केली. मात्र कपाशीवर मावा, तुडतुडे, पांढरी माशी व अन्य रोगाने थैमान घातले. सोयाबीनवर पाने गुंडाळणारी अळी, उंट अळी आल्याने शेतकरी आपल्या मनानेच कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. कृषी विभागाचा मात्र शेतकर्यांना काहीच फायदा होताना दिसत नाही.