शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीतून वाटल्या कानपूर विद्यापीठाच्या डिग्री; मुख्य सूत्रधार जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 13:20 IST

अकोला : खदान पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बनावट ‘डिग्री’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजेंदर ठिल्लुराम याला दिल्लीतून अटक करण्यात खदान पोलिसांना यश आले आहे.

अकोला : खदान पोलिसांनी उघडकीस आणलेल्या बनावट ‘डिग्री’ प्रकरणातील मुख्य सूत्रधार विजेंदर ठिल्लुराम याला दिल्लीतून अटक करण्यात खदान पोलिसांना यश आले आहे. सदर आरोपीस अटक करून गुरुवारी न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात नागपूर येथील चंद्रशेखर बनसोड याला आधीच अटक करण्यात आली आहे. या दोघांकडून कलर प्रिंटर, पेन ड्राइव्ह आणि दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.केदार वैद्यनाथ सूर्यवंशी यांच्या तक्रारीवरून बनावट डिग्री वाटप प्रकरणात खदान पोलिसांनी जुलै महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू करताना पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असता नागपूर येथील शाहनवाज अब्दुल रब, मोहम्मद इम्तीयाज अन्सारी, जुनेद अख्तर तसेच कामठी येथील कार्तिक कन्नास्वामी आणि हरियाणा येथील उधमसिंह या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या पाचही आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून नागपूर येथील चंद्रशेखर बनसोड याला १९ जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती, तर त्यानंतर गुरुवारी मुख्य सूत्रधार विजेंदर ठिल्लुराम याला अटक करण्यात आली आहे. या बनावट डिग्री प्रकरणाचा तपास ठाणेदार अनिल जुमळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकांत नावकार करीत असून, आणखी काही आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे.बनावट डिग्रीचा दिला डेमो; ठाणेदार अनिल जुमळेंना दिली बी-टेकची डिग्री!खदान पोलिसांचे एक पथक दिल्ली येथे पोहोचल्यानंतर मुख्य सूत्रधार विजेंदर ठिल्लुराम याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील काही दस्तऐवज व साहित्य जप्त केल्यानंतर पोलिसांनी त्याला डिग्री बनविण्यासंदर्भात विचारणा केली असता त्याने पोलिसांना बनावट डिग्रीचा डेमोच दिला. कुणाच्या नावाची डिग्री बनवायची, हे विचारल्यानंतर सदर आरोपीने खदानचे ठाणेदार अनिल जुमळे यांच्या नावाने काही क्षणातच बी-टेक सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री तयार करून दिली. कानपूर येथील छत्रपती शाहूजी महाराज विश्वविद्यालयातून त्यांनी ही डिग्री प्राप्त केल्याचे यावर दाखविण्यात आले, तर यासाठी २०१८ मध्येच त्यांनी परीक्षा दिल्याचीही नोंद करण्यात आली. यावरून सदर ठगबाजाने अशा अनेक डिग्री वाटप केल्याचे समोर आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी