विशेष पथकाची तेल्हारा येथे जुगारावर धाड
By Admin | Updated: July 11, 2017 20:18 IST2017-07-11T20:18:10+5:302017-07-11T20:18:10+5:30
तेल्हारा : तेल्हारा पोलीस ठाण्यांतर्गत शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाने ११ जुलै रोजी धाड टाकून कारवाई केली.

विशेष पथकाची तेल्हारा येथे जुगारावर धाड
लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : तेल्हारा पोलीस ठाण्यांतर्गत शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाने ११ जुलै रोजी धाड टाकून कारवाई केली.
तेल्हारा शहरात खुलेआम जुगार सुरू असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाने शहरातील संत तुकाराम चौक येथील जुगारावर धाड टाकून शेख अकबर शेख असदउल्ला, गजानन रमेश मोतळकार, मनोहर तुळशीराम चव्हाण यांना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून १२ हजार ५०० रुपये जप्त केले. टॉवर चौकातील गोपाल टॉकीजच्या पाठीमागे चालत असलेल्या जुगारावर धाड टाकून श्यामराव तोताराम पांडव, अशोक गणपत तायडे यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन हजार २०० रुपये, असा एकूण १४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने केली.