कनिष्ठ लिपिकास मारहाण
By Admin | Updated: June 8, 2016 02:17 IST2016-06-08T02:17:59+5:302016-06-08T02:17:59+5:30
मोताळा तहसील कार्यालयातील घटना.

कनिष्ठ लिपिकास मारहाण
मोताळा (जि. बुलडाणा): तहसील कार्यालयातील नक्कल विभागात शासकीय काम करीत असताना कनिष्ठ लिपिकास मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना ७ जून रोजी दुपारी ३ वाजता मोताळा तहसील कार्यालयात घडली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तहसील कार्यालयातील कनिष्ठ लिपिक संदीप नामदेव खराटे हे साक्षीदारासह मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास नक्कल विभागात काम करीत होते. दरम्यान, सिद्धार्थ पवार रा. डिडोळा याने कार्यालयात जावून खराटे यांना शंभर रुपयांची मागणी केली. खराटे यांनी मागणी नाकारल्याने सिद्धार्थ जाधव याने त्यांची गच्ची पकडून बुक्की मारली व शिवीगाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला, अशी फिर्याद खराटे यांनी दिल्यावरून बोराखेडी पोलिसांनी सिद्धार्थ जाधव विरुद्ध कलम ३५३, १८६, ५0४, भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास दुय्यम ठाणेदार रघुवीर शेवाळे करीत आहेत.