हवाला कांडाच्या चौकशीसाठी न्यायायालची हिरवी झेंडी

By Admin | Updated: June 12, 2014 19:06 IST2014-06-12T00:23:27+5:302014-06-12T19:06:25+5:30

श्री बालाजी इन्व्हेस्टमेंटमधून घेतली होती रक्कम

Judge of the court for the investigation of Hawala Kanda | हवाला कांडाच्या चौकशीसाठी न्यायायालची हिरवी झेंडी

हवाला कांडाच्या चौकशीसाठी न्यायायालची हिरवी झेंडी

अकोला : टिळक रोडवरील हॉटेल क्रिष्णा पॅलेसमधून मंगळवारी रात्री हवाला कांडाच्या सुमारे १५ लाख रुपयांच्या रकमेसह एका युवकास ताब्यात घेण्यात आले होते. या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी न्यायालयात अर्ज सदर रक्कम ही मालकाच्या सांगण्यावरून आपण श्री बालाजी इन्व्हेंस्टमेंट येथून घेतल्याची कबुली युवकाने न्यायालयात दिली असून, न्यायालयाने युवकास जामीन मंजूर केला.
पश्चिम बंगालमधील लखिसराय जिल्ह्यातील भंडार मननपूर येथील रहिवासी सुनीलकुमार श्रीरामभरोस महतो हा युवक २४ मेपासून टिळक रोडवरील जनता बँकेसमोरील हॉटेल क्रिष्णा पॅलेस येथे राहत होता. या युवकाजवळ हवाला रॅकेटची रक्कम असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखा व रामदास पेठ पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी या युवकावर गत चार ते पाच दिवसांपासून पाळत ठेवून मंगळवारी रात्री हॉटेल क्रिष्णा पॅलेस येथे छापा मारला. या छाप्यात सुनीलकुमार महतो याच्याकडील १४ लाख ५१ हजार ४८० रुपयांची रोख रक्कम जप्त केली. त्यानंतर पोलिसांनी महतो याला रकमेच्या व्यवहाराचे दस्तावेज मागितले असता त्याने उडवा-उडवीचे उत्तर दिले. त्यामुळे पोलिसांनी त्याचा मोबाईल व इतर साहित्य जप्त केले होते. बुधवारी दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने महतो याला जामीन मंजूर केला; मात्र दर सोमवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावणे तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

** बालाजी इन्व्हेस्टमेंटमधून घेतली रक्कम
सुनीलकुमार महतो याच्याकडे आढळलेली सुमारे १५ लाख रुपयांची रक्कम ही अलंकार मार्केटमधील श्री बालाजी इन्व्हेस्टमेंटमधून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महतो याच्या पश्चिम बंगालमधील मालकाने सांगितल्यानुसार त्याने श्री बालाजी इन्व्हेस्टमेंटमधून ही रक्कम घेतली होती.
 

Web Title: Judge of the court for the investigation of Hawala Kanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.