कनिष्ठ साहाय्यक लाच घेताना जेरबंद
By Admin | Updated: May 12, 2015 01:41 IST2015-05-12T01:41:13+5:302015-05-12T01:41:13+5:30
वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बाळापूरमध्ये कारवाई.

कनिष्ठ साहाय्यक लाच घेताना जेरबंद
अकोला - सेवानवृत्त कर्मचार्याच्या भविष्य निर्वाह निधीतील ह्यओव्हर टाईमह्णची अंशराशी व उपदानाचे सुमारे ४ लाख रुपयांचे देयक काढण्यासाठी बाळापूर पंचायत समितीमधील कनिष्ठ साहाय्यकास पाच हजार रुपयांची लाच घेताना सोमवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बाळापूर पंचायत समितीमध्ये ही कारवाई केली असून, मंगळवारी आरोपीस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. बाळापूर पंचायत समितीमधील सेवानवृत्त कर्मचार्याची भविष्य निर्वाह निधीच्या ह्यओव्हर टाईमह्णची अंशराशी व उपदानाची सुमारे ४ लाख रुपयांची रक्कम थकीत आहे. या रकमेचे देयक काढण्यासाठी बाळापूर पंचायत समितीमध्ये कनिष्ठ साहाय्यक म्हणून कार्यरत असलेला किशोर नारायण टोबरे (३0) याने सेवानवृत्त कर्मचार्याच्या मुलास सुमारे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारकर्त्याला लाच द्यायची नसल्याने त्याने या प्रकरणाची तक्रार वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख विलास पाटील यांच्याकडे केली. पाटील यांनी या प्रकरणाची पंचांसमक्ष पडताळणी केल्यानंतर कनिष्ठ साहाय्यक किशोर टोबरे याने पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही रक्कम देण्यासाठी तक्रारदार सोमवारी बाळापूर येथे आल्यानंतर किशोर टोबरेने लाच स्वीकारताच त्याला रंगेहाथ अटक केली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक व्ही.एम. अव्हाळे यांच्या मार्गदर्शनात वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील, गोकुळ पाटील, शालीग्राम झाटे, गजानन अवगळे, आतिष काळमुंधळे, संजय अंभोरे यांनी केली. आरोपी किशोर टोबरे याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.