जिनिंगला आग; ४५ लाखांचे नुकसान

By Admin | Updated: April 6, 2017 00:38 IST2017-04-06T00:38:42+5:302017-04-06T00:38:42+5:30

सायखेड (जि. अकोला)- बार्शीटाकळी येथील सिंदखेड रस्त्यावर असलेल्या इकरा जिनिंग - प्रेसिंग फॅक्टरीला मंगळवारी आग लागली. या आगीत ४५ लाख रुपयांच्या कापसाचे नुकसान झाले.

Jingala fire; 45 lakhs losses | जिनिंगला आग; ४५ लाखांचे नुकसान

जिनिंगला आग; ४५ लाखांचे नुकसान

सायखेड (जि. अकोला) : बार्शीटाकळी येथील सिंदखेड रस्त्यावर असलेल्या इकरा जिनिंग - प्रेसिंग फॅक्टरीला मंगळवारी आग लागली. या आगीत ४५ लाख रुपयांच्या कापसाचे नुकसान झाले. जिनिंगमध्ये कापसाला आग लागल्याचे लक्षात येताच अग्निशामक दलाला कळविण्यात आले. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. आगीमध्ये एक हजार क्विंटल कापूस जळाल्याने ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे; मात्र सदर आग कशामुळे लागली, ते सदर वृत्त लिहिपर्यंत समजू शकले नाही.

Web Title: Jingala fire; 45 lakhs losses