जिजाऊ उद्यान तेल्हारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:47 IST2021-01-13T04:47:35+5:302021-01-13T04:47:35+5:30
तेल्हारा : येथील जिजाऊ उद्यानात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिजाऊंच्या व ...

जिजाऊ उद्यान तेल्हारा
तेल्हारा : येथील जिजाऊ उद्यानात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जिजाऊंच्या व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष डॉ. मोनिका तराळे, नगरसेवक अनुप मार्के, सृष्टी काकड यांनी विचार व्यक्त केले. यावेळी डॉ. मोनिका तराळे, प्रतिभा वारूळकर, राजकुमार शेंडे, विवेक खारोडे, दिलीप पिवाल, अनुप मार्के, प्रशांत विखे, अनंत सोनमाळे, ॲड. संदीप देशमुख, गणेश काकड, शिवराज अहेरकर, अनिकेत बकाल, अमोल जवंजाळ, आशिष देशमुख, सौरभ खारोडे, सचिन तायडे, हर्षल ठोकणे, उद्धव पाथ्रीकर, शुभम सोनोने, गजानन जवळकार, भीमराव पोहोरकार, ओम शेंडे यांच्यासह युवक, महिला व विद्यार्थी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विवेक खारोडे यांनी केले. अनंत सोनमाळे यांनी आभार मानले.