जेसीआयचा हळदी-कुंकू सोहळा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:08+5:302021-02-05T06:14:08+5:30
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. शैलजा कोठीकर यांनी संक्रांतीच्या सणाचे महत्त्व व ...

जेसीआयचा हळदी-कुंकू सोहळा उत्साहात
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. शैलजा कोठीकर यांनी संक्रांतीच्या सणाचे महत्त्व व ऐतिहासिक पार्श्वभूमी मनोगतातून व्यक्त केली. प्रा. डॉ. सौ. रेखा रोडे यांनी स्त्रियांची कौटुंबिक भूमिका व महत्त्व विशद केले.
कार्यक्रमांमध्ये महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून आर्टिफिशिअल फुलांच्या दागिन्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. याशिवाय मुलांसाठी वर्तमानपत्रापासून कागदी फुले बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. महिला व मुलांसाठी विविध खेळांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. कार्यक्रमाला जेसीआयच्या पास्ट जेसीरेटविंग चेअरपर्सन विद्या मिरकुटे, रजनी पवार, शारदा लहाने, संगीता गांधी, राजश्री बाळे, स्मिता चावडा, वंदना झाडे, स्वाती वासे, प्रीती बनसोड, विद्या गट्टाणी, ममता टावरी, दीपाली कडू, मंगला गणोरकर यांची उपस्थिती होती. संचालन चेअरपर्सन प्रज्ञा घाटोळ यांनी, तर प्रास्ताविक प्रकल्प प्रमुख शुभांगी पिंपळे यांनी केले. आभार महिला समूहाच्या सचिव पूजा मिरकुटे यांनी मानले. प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी वैशाली शेगोकार, शुभांगी पिंपळे, रश्मी आडोकार, राजश्री कोथळकर, अरुणा खोडके, शीतल लहाने, सोनाली व्यवहारे आदींनी परिश्रम घेतले.
फोटो