उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू
By Admin | Updated: May 14, 2017 04:23 IST2017-05-14T04:23:54+5:302017-05-14T04:23:54+5:30
तेल्हारा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

उपचारादरम्यान जवानाचा मृत्यू
तेल्हारा : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले रमेश देवीदास वहिले यांचा उपचारादरम्यान १३ मे रोजी रोजी मृत्यू झाला. त्यांच्यावर तेल्हारा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
रमेश वहिले हे २00५ मध्ये भारतीय सैन्यदलात रुजू झाले. त्यांनी १३ वर्षे सेवा दिली. ते जम्मू काश्मीर भागात सेवारत असताना सहा महिन्यांपूर्वी आजारी पडले. त्यांच्यावर पुणे येथील सैनिक रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १३ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर तेल्हारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे आई-वडील, दोन भाऊ, पत्नी आणि दोन वर्षांची मुलगी आहे. दरम्यान, शहरातील सैनिकाचा मृत्यू झाल्याची माहिती महसूल आणि पोलीस प्रशासनास नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.