मनपा आयुक्तपदाचा प्रभार जावळेंकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:53 IST2021-02-20T04:53:11+5:302021-02-20T04:53:11+5:30
जलप्रदायची जबाबदारी ताठे यांच्याकडे! मनपाच्या जलप्रदाय विभागातील तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्याकडे शहर अभियंतापदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात ...

मनपा आयुक्तपदाचा प्रभार जावळेंकडे
जलप्रदायची जबाबदारी ताठे यांच्याकडे!
मनपाच्या जलप्रदाय विभागातील तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांच्याकडे शहर अभियंतापदाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला हाेता. सुरेश हुंगे सेवानिवृत्त झाल्यामुळे ही दाेन्ही पदे रिक्त झाली. दरम्यान, जलप्रदाय विभागाच्या माध्यमातून स्वत:च्या आर्थिक तुंबड्या भरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी चांगलाच दणका दिल्याचे समाेर आले. जलप्रदाय विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाची धुरा या विभागातील कंत्राटी उपअभियंता एच.जी.ताठे यांच्याकडे देण्यात आली.
‘या’ विभागाची विश्वासर्हता पणाला
मनपाच्या बांधकाम विभागातील एका कर्मचाऱ्याला केवळ हद्दवाढ क्षेत्रातील विकास कामांची देयके मंजूर करण्याची महत्त्वाची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. यामध्ये प्रामाणिकतेचा आव आणणाऱ्या एका लाेकप्रतिनिधीने माेलाची भूमिका बजावली. डाेक्यावर राजकारण्यांचा हात असल्यामुळेच हा कर्मचारी अधिनस्थ कनिष्ठ अभियंत्यांवर दबावतंत्राचा वापर करीत असल्याने, या विभागाची विश्वासार्हता पणाला लागली आहे.