शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

जानेवारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:37 IST

अकोला :  शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून राज्यात पक्ष बांधणीसाठी सरसावलेले शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ जानेवारी महिन्यात धडाडणार आहे.

ठळक मुद्देदोन सभा आणि शेतकर्‍यांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून राज्यात पक्ष बांधणीसाठी सरसावलेले शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ जानेवारी महिन्यात धडाडणार आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांसोबत संवाद साधण्यासोबतच उद्धव ठाकरे यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. पक्षप्रमुख ठाकरे यांचा अकोला जिल्ह्याकडे वाढलेला कल पाहता ऐन थंडीच्या दिवसांत जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून पक्षाची मजबूत बांधणी करणार्‍या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मे महिन्यात विधानसभा मतदारसंघनिहाय शेतकर्‍यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. उद्धव ठाकरे यांनी १५ मे रोजी पश्‍चिम विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. २0१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने युती तुटली, त्याची सल अद्यापही शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यामुळेच सत्तेत सहभागी असूनही पहिल्या दिवसांपासून शिवसेनेने भाजपावर टीका किंवा विरोध करण्याची एकही संधी सोडल्याचे दिसत नाही. अर्थातच, २0१९ मध्ये पार पडणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या उद्देशातून शिवसेनेने चारही बाजूने मजबूत तटबंदी निर्माण करण्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. १0 जानेवारी रोजी पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिल्ह्यात आगमन होत असून, जाहीर सभांच्या माध्यमातून त्यांची तोफ धडाडणार आहे. 

दोन सभा आणि शेतकर्‍यांशी संवादशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे १0 जानेवारीला सकाळी १0 वाजता आगमन होईल. ११.३0 वाजता लाखपुरी येथे शेतकर्‍यांसोबत संवाद साधतील. दुपारी २ वाजता अकोट येथे सभा, ४ वाजता उरळ येथे शेतकर्‍यांसोबत संवाद साधतील. सायंकाळी जुने शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सभा; रात्री मुक्काम केल्यानंतर ११ जानेवारी रोजी सकाळी वाशिमकडे प्रयाण करणार असल्याची माहिती आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ मे रोजी शिवसंपर्क अभियानच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकर्‍यांसोबत संवाद साधला होता. त्यानंतर महिनाभरात पक्षप्रमुखांनी तीन वेळा अकोला जिल्ह्याचा दौरा केला. आता सहा महिन्यांनी पुन्हा पक्षप्रमुखांचे आगमन होत आहे. जिल्ह्यात शिवसेना सक्रिय होण्यासोबतच संघटना मजबूत झाल्याचे यानिमित्ताने दिसून येत आहे.-नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना

टॅग्स :Akola cityअकोला शहरShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे