शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ शृंखला तोडण्यासाठी ‘लॉकडाऊन’; पश्चिम विदर्भात १०० बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 17:33 IST

एखाद्या आवाहनास प्रतिसाद देत १०० टक्के बंद पाळण्याची ही १९९० च्या दशकानंतरची पहिलीच घटना म्हणावी लागेल.

ठळक मुद्देअकोला शहर, जिल्ह्यातील रस्त्यांवर शुकशकाट होता.गतिमान जीवनास ब्रेक लावल्याचे चित्र सकाळीच ७ वाजतापासून बुलडाणा जिल्ह्यात दृष्टिपथास आले. वाशिम जिल्ह्यात २२ मार्च रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

अकोला: कोरोना विषाणूचा कम्युनल स्प्रेड रोखण्याच्या (सामाजिक प्रसार) दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत:ला स्वयंस्फूर्तपणे घरातच ‘लॉकडाऊन’ करून घेतले. स्वयंस्फूर्तपणे एखाद्या आवाहनास प्रतिसाद देत १०० टक्के बंद पाळण्याची ही १९९० च्या दशकानंतरची पहिलीच घटना म्हणावी लागेल.कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी शासनाने केलेल्या आव्हानाला अकोल्याची जनता, व्यापारी, उद्योजक, सर्वच प्रतिष्ठानांचे संचालक, आॅटो, वाहन चालकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यामुळे शहरातील रस्त्यावर सकाळी अकोला शहर, जिल्ह्यातील रस्त्यांवर शुकशकाट होता. अकोल्यात भाजीपाला, अन्नधान्य या जीवनावश्यक वस्तूंची विक्रीही बंद होती. पेट्रोलपंप मात्र सुरू होती; ‘शृंखला पायी असू दे, मी गीत गतीचे गायीन’ ही कविता एक अर्थबोध देणारी असली तरी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अर्थात कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी एक प्रकारे बुलडाणेकरांनी त्यांच्या गतिमान जीवनास ब्रेक लावल्याचे चित्र सकाळीच ७ वाजतापासून बुलडाणा जिल्ह्यात दृष्टिपथास आले. वाशिम जिल्ह्यात २२ मार्च रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वसाहती, बाजार, मुख्य चौक, सार्वजनिक स्थळे निर्जन होतीच, शिवाय जिल्हाभरातील मार्गावरही शुकशुकाट दिसून आला. यादरम्यान, सर्वच मुख्य मार्गासह शहरांमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. रेल्वे स्टेशन, बसस्थानक, पेट्रोल पंप, बाजारपेठ आदी ठिकाणे ओस पडल्याचे दिसून आले. काही खासगी दवाखाने आणि मेडिकलचा अपवाद वगळता अन्य दवाखाने व मेडिकलही बंद होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाbuldhanaबुलडाणाwashimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस