‘जय श्रीराम’चा गजर
By Admin | Updated: April 16, 2016 02:09 IST2016-04-16T02:09:48+5:302016-04-16T02:09:48+5:30
अकोल्यात दर्शनासाठी उसळला भक्तांचा महासागर : शोभायात्रेने वेधले लक्ष.

‘जय श्रीराम’चा गजर
अकोला: 'जय श्री राम'चा गजर करीत, प्रभू श्रीरामचंद्राच्या दर्शनासाठी मोठय़ा राम मंदिरात भक्तांचा महासागर उसळला. दुष्काळी परिस्थितीमुळे तहानलेल्या भूमीमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी हजारो भाविकांनी प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी साकडे घालून; सुख, शांती व समृद्धीसाठी मनोकामना केली. रामनवमीनिमित्त शुक्रवार, १५ एप्रिल रोजी शहरातील प्रमुख मार्गाने निघालेल्या शोभायात्रेत भाविकांच्या गर्दीने अनेक वर्षांचा विक्रम मोडीम काढल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
रामनवमीनिमित्त सिटी कोतवाली चौकातील मोठय़ा राम मंदिरात शुक्रवारी दुपारी १२ वाजता प्रचंड जल्लोषात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी ९ वाजता युगुलचरण पादुकांना व गाभार्यातील श्रीराम दरबाराला दुग्धाभिषेक करण्यात आला. तद्नंतर मुंबईच्या संध्या वीरकर यांचे कीर्तन झाले. मंदिराच्या सभागृहात जमलेल्या रामभक्तांनी दुपारी १२ वाजता ह्यप्रभू श्रीरामचंद्र की जयह्ण असा जयघोष करीत रामजन्मोत्सव सजारा केला. याप्रसंगी ह्यजय श्रीरामह्ण असा जयघोष करणार्या बालवीर हनुमानाने सर्व भाविकांचे लक्ष आकर्षित करून घेतले. राम जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी जमलेल्या भाविकांना याप्रसंगी श्रीराम व हरिहर संस्थानाच्यावतीने प्रसाद वितरित करण्यात आला. तद्नंतर दिवसभर दर्शनासाठी येणार्या भाविकांची मंदिरात रीघ लागली होती.