धनेगाव येथील चोरीच्या घटनेतील मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:23 IST2021-08-20T04:23:47+5:302021-08-20T04:23:47+5:30

धनेगाव येथे काही दिवसापूर्वी कांद्याचे गोडाऊन फोडण्यात आले होते. या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेले शेतकऱ्याचे ४० कांद्याचे कट्टे जवळपास २० ...

Items seized in Dhanegaon theft case | धनेगाव येथील चोरीच्या घटनेतील मुद्देमाल जप्त

धनेगाव येथील चोरीच्या घटनेतील मुद्देमाल जप्त

धनेगाव येथे काही दिवसापूर्वी कांद्याचे गोडाऊन फोडण्यात आले होते. या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आलेले शेतकऱ्याचे ४० कांद्याचे कट्टे जवळपास २० क्विंटल कांदे चोरी गेले होते. या गुन्ह्याची माहिती मिळताच चौकीचे प्रभारी अधिकारी मनोज वासाडे व पथकाने ही कारवाई केली. वाडेगाव परिसरातील विविध चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींकडून नगदी मुद्देमाल जप्त केला. तसेच इतर ठिकाणच्या दोन दुचाकी किंमत अंदाजे एक लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. बाळापूरचे ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाडेगाव चौकी प्रभारी अधिकारी मनोज वासाडे, विनायक पवार, गणेश गावंडे, सोहेल खान, संतोष सोळंके, गणेश जंजाळ या पथकाने ही कारवाई केली. या गुन्ह्याचा तपास दत्तात्रय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष राठोड करीत आहेत.

Web Title: Items seized in Dhanegaon theft case