धार्मिक स्थळांचा मुद्दा तापला; कारवाईचा दिला आदेश

By Admin | Updated: February 6, 2016 02:18 IST2016-02-06T02:18:30+5:302016-02-06T02:18:30+5:30

आयुक्तांनी दिल्या क्षेत्रीय अधिका-यांना कानपिचक्या.

The issue of religious places washed; Action ordered | धार्मिक स्थळांचा मुद्दा तापला; कारवाईचा दिला आदेश

धार्मिक स्थळांचा मुद्दा तापला; कारवाईचा दिला आदेश

अकोला: शहरातील धार्मिक स्थळांना हटवण्याचा महापालिका आयुक्त अजय लहाने यांचा स्पष्ट आदेश असताना क्षेत्रीय अधिकार्‍यांनी काढता पाय घेतला. यामुळे मनपाची मोहीम थंडावल्याचे वृत्त ह्यलोकमतह्णने प्रकाशित करताच शुक्रवारी आयुक्तांनी चारही क्षेत्रीय अधिकार्‍यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. कोणत्याही परिस्थितीत धार्मिक स्थळे हटवण्याची कारवाई करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला. शहरात उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांना हटवण्याचा थेट सर्वोच्च न्यायालयाने राज्य शासनाला आदेश जारी केला. शासनाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त अजय लहाने यांनी धार्मिक स्थळांची यादी तयार केली. पहिल्या टप्प्यात २00९ नंतर उभारलेल्या ५६ स्थळांना हटविण्याचा क्षेत्रीय अधिकार्‍यांना आदेश दिला. चारही झोन अधिकार्‍यांनी त्यांच्या क्षेत्रातील धार्मिक स्थळे हटवून कारवाईचा अहवाल प्रशासनाकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे. सुरुवातीला धार्मिक स्थळे हटवण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. नागरिकांचा थंड प्रतिसाद पाहता प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. मात्र, थोड्याच दिवसात क्षेत्रीय अधिकार्‍यांनी कारवाईपासून चार हात लांब राहणे पसंत केले. पूर्व झोनमधील स्थळे हटवल्यानंतर क्षेत्रीय अधिकार्‍यांनी हात आखडता घेतल्याने प्रशासन भेदभाव करीत असल्याचा आरोप शहरात सुरू झाला. याविषयी ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित करताच, आयुक्त अजय लहाने यांनी त्यांच्या दालनात क्षेत्रीय अधिकार्‍यांची बैठक बोलावली. पहिल्या टप्प्यातील स्थळे कोणत्याही स्थितीत हटवण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.

Web Title: The issue of religious places washed; Action ordered