इसमाची आत्महत्या
By Admin | Updated: June 29, 2016 00:22 IST2016-06-29T00:22:57+5:302016-06-29T00:22:57+5:30
मोताळा तालुक्यातील राजूर येथील इसमाने गळफास घेऊनआत्महत्या केल्याचे उघडकीस.

इसमाची आत्महत्या
मोताळा(जि. बुलडाणा): तालुक्यातील राजूर येथील मगन दगडू पुरभे (वय ५0) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २७ जून रोजी संध्याकाळी उघडकीस आली. मगन पुरभे यांनी स्वत:च्या घरात गळफास घेतला असल्याची फिर्याद मृताचे नातेवाइक कैलास छगन पुरभे यांनी पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दिली. याप्रकरणी बोराखेडी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद क रण्यात आली आहे. मगन पुरभे यांच्यावर चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी बोराखेडी ठाण्यात २४ जून रोजी कलम ३२४, ५0४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेच्या तिसर्या दिवशी मगन पुरभेने गळफास लावून आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली आहे.