Irregularity in the work; Eight Engineers of Akola zone of MSEDCL, get 'Show Cause' | कामात अनियमितता; महावितरणच्या अकोला परिमंडळातील आठ अभियंत्यांना ‘शो कॉज’
कामात अनियमितता; महावितरणच्या अकोला परिमंडळातील आठ अभियंत्यांना ‘शो कॉज’

अकोला:नेमून दिलेल्या कामात अनियमितता आणि कार्यालयीन बेशिस्तीचा ठपका ठेवित महावितरणच्याअकोला परिमंडलांतर्गत कार्यरत दोन कार्यकारी अभियंते आणि सहा उपविभागिय अधिकाऱ्यांसह एकूण आठ वरिष्ठ अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी दिले आहे. एका महिन्याच्या आत या अभियंत्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास त्यांचेवर निलंबनाची कारवाई करण्याचा गर्भित इशाराही दिलीप घुगल यांनी दिला आहे.
अकोला परिमंडलांतर्गत असलेल्या वाशिम, बुलढाणा आणि अकोला या तिनही मंडलांतर्गत कार्यरत वरिष्ठ अधिकारी आणि अभियंत्यांच्या जिल्हानिहाय स्वतंत्र आढावा बैठक घेत प्रादेशिक संचालकांनी तेथील वीज वितरण यंत्रणा, बिलींग आदी विषयांचा विस्तृत आढावा घेतला. या बैठकांदरम्यान वाशिम आणि खामगाव विभागांसोबतच कारंजा, वाशिम, मेहकर, देऊळगाव राजा, चिखली आणि लोणार या उपविभागांचे काम असमाधानकारक असल्याने दिलीप घुगल यांनी नाराजी व्यक्त करीत येथील वरिष्ठ अधिका-यांविरोधात कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश दिले.

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे
परिमंडलातील ग्राहकांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळण्यासाठी देखभाल व दुरुस्तीची कामे नियमितपणे करण्यासोबतच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी रहावे असे स्पष्ट निर्देश दिले. काही उपकेंद्रांना आकस्मिक भेटी देत पूर्ण पाहणीअंती तेथील देखभाल व दुरुस्तीच्या कामातील तृटी दूर करण्याकरिता उपाययोजना सुचविल्या व त्यांची त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले

वीज ग्राहकांना योग्य व तत्पर सेवा देणे, त्यांच्यासोबत सौजन्याने वागणे, त्यांच्या तक्रारी ऐकून त्यांचे त्वरीत निराकरण करणे, त्यांच्या फोनला योग्य प्रतिसाद देण्याबाबतही दिलीप गुगल यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी आठवड्यातून दोन दिवस उपविभागीय कार्यालये आणि शाखा कार्यालयात भेटी देत तेथील बिलिंग, अखंडित वीज पुरवठा आणि उपकेंद्रातून होणाº्या ट्रीपिंगचा आढावा घेत त्याची नोंद मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून घेतले जात असल्याचे सुनिश्चित करावे. अकोला परिमंडलांतर्गत असलेल्या उपविभागीय कार्यालये स्तरावर ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी मिळावे घेण्याच्या सूचनाही प्रादेशिक संचालक यांनी यावेळी केल्या.


सौर कृषीपंप योजनेबाबत ग्राहकांना मार्गदर्शन  देण्यात यावे,
नवीन वीज पुरवठा घेण्याकरिता पैशाचा भरणा करूनही प्रलंबित असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना प्राधान्याने वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. उच्चदाब वितरण प्रणाली व सौर कृषीपंप योजनेबाबत ग्राहकांना कार्यालयीन स्तरावर योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात यावे, ग्राहक तक्रार निवारण मेळाव्यातही याबाबत ग्राहकांना विस्तृत मार्गदर्शन करण्यासोबतच महावितरणच्या कामकाजाची, प्रगतीची व काही कारणास्तव वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधींना आणि पत्रकारांना उपलब्ध करून  देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
या बैठकांना अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा राहुल बोरीकर यांच्यासोबत तिनही मंडलांचे अधीक्षक अभियंते, सर्व कार्यकारी अभियंते, वरिस्ठ अधिकारी व अभियंते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Web Title: Irregularity in the work; Eight Engineers of Akola zone of MSEDCL, get 'Show Cause'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.