शेतकरी प्रशिक्षणावरील निधीत अनियमितता!

By Admin | Updated: December 24, 2015 02:51 IST2015-12-24T02:51:44+5:302015-12-24T02:51:44+5:30

विधिमंडळात रणधीर सावरकरांचा प्रश्न; कृषिमंत्र्यांनी दिला चौकशीचा आदेश.

Irregularities in funding of farmers' training! | शेतकरी प्रशिक्षणावरील निधीत अनियमितता!

शेतकरी प्रशिक्षणावरील निधीत अनियमितता!

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाने पाचगणी येथील सार्वजनिक संस्थेकडून शेतकर्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधानकडून प्राप्त निधीमध्ये अनियमितता झाल्याच्या चौकशी करण्याचा आदेश कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांनी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला दिला. याशिवाय कृषी विद्यापीठातील अंतर्गत आंतरराष्ट्रीय शेतकरी परिषदेच्या आयोजनासाठी विनाअनुदानित कृषी शाळा व महाविद्यालयांकडून बळजबरीने देणग्या वसूल करण्याच्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेशसुद्धा यावेळी देण्यात आला. आमदार रणधीर सावरकर यांनी विद्यापीठातील हे प्रकार विधीमंडळ अधिवेशनामध्ये उपस्थित केले होते. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून आयोजित आंतरराष्ट्रीय शेतकरी प्रशिक्षण व त्यासाठी विद्यापीठाला प्राप्त झालेल्या निधीतील अनियमितता सावरकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. विद्यापीठाला भारतीय कृषी अनुसंधानकडून हा निधी मिळाला होता. कृषी विद्यापीठ विषय तज्ज्ञांना नवीन प्रशिक्षण व अद्ययावत ज्ञानासाठी उपलब्ध होणारा निधी, मूळ उद्देशासाठी खर्च न करता तणावमुक्तीसारख्या सामान्य प्रशिक्षणावर खर्च करून पाचगणीस्थित अशासकीय संस्थेत कर्मचार्‍यांना पाठवून निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आ. सावरकर यांनी सभागृहात केला. या दोन्ही प्रकरणात चौकशी करण्याचा आदेश दिला असल्याचे कृषिमंत्री खडसे यांनी सभागृहात सांगितले. याश्‍विाय विद्यापीठातील पीएचडी, अवैध गुणवत्ता वाढप्रकरणीही सावरकर यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. पीएचडीसारख्या उच्चतम पदव्या त्यांचा दर्जा राखून वितरित व्हाव्यात व शिक्षणाची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे ढासळू नये, याबाबत चौकशी करून योग्य ते निर्देश विद्यापीठाला द्यावेत, यासाठीसुद्धा आमदार रणधीर सावरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Web Title: Irregularities in funding of farmers' training!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.