शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा; सट्टा किंग सुधीर सावंतसह पाच गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 12:39 IST

अकोला : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या ११ व्या सीझनमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स एलेव्हन पंजाब यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सनसिटीतील सट्टा अड्ड्यावर दहशतवाद विरोधी कक्षाने छापा टाकला.

अकोला : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या ११ व्या सीझनमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स एलेव्हन पंजाब यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सनसिटीतील सट्टा अड्ड्यावर दहशतवाद विरोधी कक्षाने छापा टाकला. या ठिकाणावरून राज्यातील सर्वात मोठा सट्टा किंग सुधीर सावंतसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मोबाइल, लॅपटॉपसह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलकापूर रोडवर असलेल्या सनसिटीमधील एका आलिशान बंगल्यात ‘आयपीएल’च्या सामन्यांवर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळण्यात येत असल्याची माहिती दहशतवाद विरोधी कक्षाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पथकासह छापा टाकून या ठिकाणावरून सुधीर क्रिष्णा सावंत रा. रामदासपेठ, श्याम हेडा रा. रामनगर, प्रवीण नारायण अहीर, कौस्तुभ संजय ठाकरे व विनोदकुमार सनसिंहकुमार या पाच जणांना रंगेहात अटक केली. सनसिटीतील या बंगल्याच्या दरवाजांना बाहेरून कुलुप लावून आतमध्ये सट्ट्याचा बाजार सुरू होता. दिल्लीतून आणलेली एक खास मशीन, ५४ मोबाइल, चार लॅपटॉप, दोन टीव्ही, सेटअप बॉक्ससह लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोनशेच्यावर जणांकडे अ‍ॅपआयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्यासाठी एक विशेष अ‍ॅप तयार करण्यात आले असून, सुधीर सावंत आणि श्याम हेडा या दोघांनी हे अ‍ॅप जिल्ह्यातील तब्बल दोनशेच्यावर मोबाइलमध्ये डाउनलोड करून दिले. या अ‍ॅपच्या माध्यमातून सट्ट्याची देवाण-घेवाण करण्यात येत असून, अ‍ॅपचा पासवर्डही श्याम हेडाकडेच असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळेसुधीर सावंत याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाळे असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मूळचा सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सावंतचे अकोल्यातील कामकाज श्याम हेडा पाहतो. त्याच्या रकमेची देवाण-घेवाण आणि आयपीएलवरील सट्ट्याची माहिती घेण्यासाठीच तो आलिशान कारने अकोल्यात आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतून आणलेली खास मशीन जप्तसट्टा खेळण्यासाठी एक खास मशीन दिल्लीतून आणण्यात आली आहे. या मशीनद्वारे जिल्ह्यातील दोनशेच्यावर मोबाइल अटॅच करण्यात आले असून, त्याद्वारे मध्यस्थी करणारे आणि मुख्य सट्टा खेळणारे यांच्यात समन्वय साधण्यात येत होता. दोन दिवसांपूर्वी मधुबन हॉटेलमधून ताब्यात घेण्यात आलेले ऋषभ पटेल, मयंक अग्रवाल आणि दीपक खत्री हे तिघेही याच अ‍ॅपद्वारे सट्टा खेळत होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाIPL 2019आयपीएल 2019Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीCrime Newsगुन्हेगारी