झुकलेले रोहित्र अपघातास निमंत्रण

By Admin | Updated: June 8, 2014 00:55 IST2014-06-07T22:32:46+5:302014-06-08T00:55:11+5:30

हिंगणा (निंबा) येथे मुख्य वीज वाहिनीचे रोहित्र आणि गावातील वीज खांब पूर्णपणे झुकले आहेत.

Invite to tilted flamingo accident | झुकलेले रोहित्र अपघातास निमंत्रण

झुकलेले रोहित्र अपघातास निमंत्रण

निंबा: येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणा (निंबा) येथे मुख्य वीज वाहिनीचे रोहित्र आणि गावातील वीज खांब पूर्णपणे झुकले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असताना आणि त्यांची दुरुस्ती करण्यासाठी वारंवार तक्रार करूनही वीज वितरण कं पनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.
हिंगणा निंबा येथे वीज पुरवठा करणार्‍या मुख्य वाहिनीचे रोहित्र पूर्णपणे झुकले असून, गावातील वीज खांबही मोठ्या प्रमाणात झुकले आहेत. झुकलेल्या खांबावरील थ्री फेज वीज तारा कैलास यशवंत तायडे यांच्या घरावर अवघ्या ४ ते ५ फूट अंतरावर लोंबकळत असून, त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. या वीज तारा व्यवस्थित करण्यासाठी वीज वितरणकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली, तरी कारंजा रमजानपूर येथील वीज वितरण कार्यालयाकडून ६ महिन्यांपासून दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. दुसरीकडे रोहित्र झुकल्यामुळे त्या खांबावरून जाणार्‍या वीज ताराही मोठ्या प्रमाणात झुकल्यामुळे शेतात काम करणार्‍या शेतमजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्याकडेही वीज वितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. एखादवेळी मोठा अपघात होऊन गोरगरीब मजुराचा त्यामध्ये बळी गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आणि एखाद्याचा बळी गेल्यावरच वीज वितरण दुरुस्तीचे काम करणार काय, असे प्रश्न संतप्त ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी या प्रकरणी स्वत: लक्ष घालून दुरुस्तीचे काम तत्काळ के ले नाही तर परिसरातील जनता वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन क रण्याच्या मनस्थितीत असल्याचे दिसत आहे. (वार्ताहर)

Web Title: Invite to tilted flamingo accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.