गुंतवणूकदाराची पाच लाखांनी फसवणूक नागपूरच्या वासनकर कंपनीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By Admin | Updated: June 15, 2014 01:33 IST2014-06-14T23:35:01+5:302014-06-15T01:33:20+5:30

अकोल्यातील गुंतवणूकदाराची पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी नागपूरच्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीसह तिघा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Investigator booked for cheating of three lakhs in Nagpur | गुंतवणूकदाराची पाच लाखांनी फसवणूक नागपूरच्या वासनकर कंपनीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गुंतवणूकदाराची पाच लाखांनी फसवणूक नागपूरच्या वासनकर कंपनीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अकोला: अकोल्यातील गुंतवणूकदाराची पाच लाख रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी शनिवारी रात्री १0.३0 वाजताच्या सुमारास नागपूरच्या वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीसह तिघा संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
शहरातील अरुण साहेबराव देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांनी तीन वर्षांपूर्वी नागपूरमधील शिवाजी नगरातील वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली. गुंतवणूक करण्यापूर्वी त्यांना वासनकर वेल्थ मॅनेजमेंट प्रा. लि कंपनीचे जयस्वाल रोड नागपूर येथे राहणारे प्रशांत जयदेव वासनकर(४२), लक्ष्मी रोड नागपूर येथे राहणारे अभिजित चौैधरी आणि शिवाजी नगर नागपूर येथे राहणारी विथिला विनय वासनकर या लोकांनी वासनकर कंपनीच्या गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या आणि आकर्षक व्याज देणार्‍या योजना आहेत आणि या योजनेमध्ये सहभागी झाल्यास गुंतवणूकदाराला ३0 महिन्यांमध्ये दुप्पट रक्कम आणि तिही व्याजासहित मिळेल, अशा प्रकारची आमिषं दाखविली. या आमिषाला अरुण देशमुख यांनी बळी पडून कंपनीमध्ये पाच लाख रुपयांची गुंतवणूक केली. आरोपींनी तीन महिन्यांनंतर दामदुप्पट योजनेच्या माध्यमातून १२ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून आपल्याला ११ लाख रुपयांचा धनादेश ४ जानेवारी २0१४ रोजी दिला. हा धनादेश आपण देना बँकेमध्ये वटविण्यास टाकला; परंतु कंपनीच्या खात्यात पैसे नसल्याने हा धनादेश अनादरीत झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे अरुण देशमुख यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कंपनीकडे पैशांची मागणी केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. अखेर शनिवारी अरुण देशमुख यांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात धाव घेत, आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार सिव्हिल लाईन पोलिसांनी वासनकर कंपनीसह तिघा संचालकांविरुद्ध भादंवि कलम ४२0, ४६८, ४0६, ४७१, १२0 ब नुसार गुन्हा दाखल केला.
बॉक्स: वासनकर कंपनीमध्ये अकोल्यातूनही कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक
नागपूरच्या श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीने शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याची घटना ताजी असतानाच, पुन्हा नागपूरच्याच वासनकर कंंपनीने फसवणूक केल्याची बाबसुद्धा यापूर्वीच उघडकीस आली होती; परंतु गुंतवणूकदारांनी तक्रार दिली नव्हती. श्रीसूर्या कंंपनीप्रमाणेच वासनकर वेल्थ मॅनेजमेंट कंपनीने शहरात गुंतवणूकदारांचे मेळावे, सभा घेऊन त्यांना वेगवेगळी आमिषं दाखविले. त्यानुसार शेकडो गुंतवणूकदारांनी कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. वासनकर कंपनीचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर तब्बल पाच महिन्यानंतर अकोल्यातील एकाच गुंतवणूकदार तक्रार देण्यासाठी पुढे आला.

Web Title: Investigator booked for cheating of three lakhs in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.