शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

भरतीया निवासस्थान चाेरी प्रकरणाचा फुटेजच्या आधारे तपास; संशयितांची झाडाझडती

By सचिन राऊत | Updated: May 6, 2024 00:22 IST

चाेरीचा एकूण मुद्देमाल सुमारे ४३ लाखांचा; पाेलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह

सचिन राऊत, अकोला: खदान पोलिस स्टेशन हद्दीतील गाैरक्षण राेडवरील भरतीया निवासस्थानी अज्ञात चाेरट्यांनी हैदाेस घालीत धाडसी चाेरी करून ४३ लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्यानंतर खदान पाेलिसांनी गुन्हे दाखल करून आराेपींचा शाेध सुरू केला आहे. या परिसरातील विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज गाेळा करण्यात आले असून, त्या आधारे संशयितांची झाडाझडती घेण्याचे कामही पाेलिसांनी सुरू केले आहे.

गाैरक्षण राेडवरील चार बंगल्याच्या समाेरील रहिवासी राणी ब्रिजमाेहन भरतीया यांच्या आलिशान निवासस्थानातून अज्ञात चाेरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रकमेसह ४३ लाख रुपयांच्या ऐवज लंपास केला हाेता. हा प्रकार शनिवारी पहाटे कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. चोरट्यांनी आवारभिंतीला शिडी लावून बंगल्याच्या मागील बाजूने आतमध्ये प्रवेश केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.

दरम्यान, या धाडसी घरफोडीमुळे पाेलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने आता पाेलिसांनी या राेडसह बंगल्याच्या मागील बाजूला असलेल्या तीन राेडवरील काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीला सुरुवात केली असून, या आधारे अज्ञात चाेरट्यांचा शाेध सुरू करण्यात आला आहे. चोरट्यांनी पळ काढताना सोन्या-चांदीचे रिकामे झालेले बॉक्स व काही इतर साहित्य बंगल्याबाहेर फेकून दिल्यानंतर ठसेतज्ज्ञांकडून ठसे घेण्यात आले असून, त्या आधारेही तपास सुरू करण्यात आला आहे.

-------------------------------------------------------------------------------चाेरट्यांची माहिती घेणे सुरूया चाेरी प्रकरणात खदान पाेलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही संशयित चाेरट्यांचा डेटा गाेळा करणे सुरू केले आहे. या चाेरट्यांचा शाेध घेण्याचे पाेलिसांसमाेर माेठे आव्हान असले तरीही चाेरट्यांना लवकरच बेड्या ठाेकण्यात येणार असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीRobberyचोरीAkolaअकोला