‘राखे’मधील लाचखोरीची चौकशी

By Admin | Updated: June 21, 2014 01:27 IST2014-06-21T01:11:18+5:302014-06-21T01:27:19+5:30

अकोला जिल्ह्यातील पारस औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकार

Investigation of the bribe in 'Rakhee' | ‘राखे’मधील लाचखोरीची चौकशी

‘राखे’मधील लाचखोरीची चौकशी

अकोला: पारस येथील औष्णिक विद्युत प्रकल्पातील राख नेण्यासाठी पासऐवजी रोख रक्कम घेत असल्याच्या प्रकाराची प्रशासनाने चौकशी सुरू केली आहे. राख नेण्यासाठी वाहनाचालकांकडून सुरक्षा रक्षक पावतीऐवजी रोख रक्कम घेत असल्याचा प्रकार ह्यलोकमतह्णने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून उजेडात आला होता. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर महाजनकोने चौकशीचे आदेश दिले. याबाबत महाजनकोचे उपअभियंता माधव कोठुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले.
पारस येथील प्रकल्पात रोज शेकडो टन राख जमा होते. राख भरण्याकरिता आतमध्ये जाण्यासाठी संबंधित वाहन चालकाला महाजनकोकडून पावती पुस्तक दिले जाते. एका पावती पुस्तकामध्ये २५ पासेस असतात. पुस्तकासाठी १ हजार ३00 रुपये आकारले जातात. आत जाण्यापूर्वी संबंधित वाहनचालकाला पावती पुस्तकामधील एक पास सुरक्षा चौकीमधील रक्षकाजवळ जमा करावी लागते. मात्र बहुतांश वाहनचालक पास न देता रोख पैसे देऊन आतमध्ये जातात.
या लाचखोरीचा फटका महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीला (महाजनको) बसतो.

Web Title: Investigation of the bribe in 'Rakhee'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.