सोयाबीनवर ‘व्हाईट फ्लाय’चे आक्रमण
By Admin | Updated: September 27, 2014 00:20 IST2014-09-27T00:13:55+5:302014-09-27T00:20:12+5:30
पश्चिम व-हाडात सोयाबीन पिकावर ‘व्हाईट फ्लाय’ किडीचे आक्रमण झाल्याने नवे संकट.

सोयाबीनवर ‘व्हाईट फ्लाय’चे आक्रमण
ब्रम्हानंद जाधव/मेहकर ( बुलडाणा)
पश्चिम वर्हाडात सोयाबीन पिकावर ह्यव्हाईट फ्लायह्ण किडीचे आक्रमण झाल्याने नवे संकट आले आहे. अशा परिस्थितीत पंधरवड्यापासून पाऊस फिरकला नसल्याने, रखरखत्या उन्हाचा फटकाही सोयाबीनला बसत असून, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
पश्चिम वर्हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यात यावर्षी ८ लाख ३७ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. पावसाने सुरूवातीलाच हुलकावणी दिल्यामूळे शेतकर्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली. त्यानंतर मध्यंतरी झालेल्या समाधानकारक पावसाने सोयाबीनचे पीक शेतात डोलत असतानाच, ह्यस्पोडोप्टेरा लिट्यूराह्ण या भयावह किडीचे आक्रमण झाले. या किडीपासून पीक वाचविण्यासाठी शेतकर्यांनी महागड्या औषधांची फवारणी केली; परंतू आता पुन्हा ह्यव्हाईट फ्लायह्ण या किडीचे आक्रमण झाल्याने पीक धोक्यात आले आहे. याशिवाय, पंधरवड्यापासून पश्चिम वर्हाडात पाऊस नसल्याने रखरखत्या उन्हाच्या तडाख्यात सोयाबीन होरपळून निघत आहे. ही परिस्थिती सोयाबीनसाठी कर्दनकाळ ठरत आहे. शेतकर्यांनी पीक वाचविण्यासाठी पिकाला पाणी देण्यास सुरूवात केली असून ज्यांच्याकडे ओलिताची सोय नाही, ते शेतकरी मात्र असहाय्य झाले आहेत.
सद्यस्थितीत व्हाईट फ्लाय ही किड कोषावस्थेत गेलेली आहे. त्यासाठी शक्य झाल्यास पिकास संरक्षित ओलित करावे. फवारणीसोबत डीएपी किंवा युरीया खताची दोन टक्के मात्रा वापरावी. त्यामुळे सोयाबीनच्या शेंगा भरण्यास मदत होईल असे तालुका कृषि अधिकारी मधुकर काळे यांनी सांगीतले.
*** ह्यव्हाईट फ्लायह्णचे जीवनचक्र
व्हाईट फ्लाय लहान व चमकदार अळी असून, ही मादी खोडाच्या व फांदीच्या पेशीत पिवळसर अंडी घालते. अंडी अवस्था २ ते ५ दिवस तर, अळी अवस्था १0 ते १५ दिवस रहाते. ही अळी बीन पायाची, फिक्कट पिवळी आणि तीन ते चार मि.मी. लांब असते. अळी फांद्यात किंवा खोडातच कोषावस्थेत जाते. कोषावस्था ७ ते १0 दिवसाची असते. या किडीच्या वर्षभरात सात ते आठ पिढय़ा होतात.