५७५ युवक-युवतींनी दिला परिचय

By Admin | Updated: December 26, 2014 00:33 IST2014-12-26T00:33:15+5:302014-12-26T00:33:42+5:30

मराठा सेवा संघाच्या परिचय मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद.

Introduction of 575 youths | ५७५ युवक-युवतींनी दिला परिचय

५७५ युवक-युवतींनी दिला परिचय

अकोला : अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्यावतीने आयोजित उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याला समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात ५७५ उपवरांनी त्यांचा परिचय दिला. अखिल भारतीय मराठा सेवा संघाने गुरुवारी कौलखेड येथील जानोरकर मंगल कार्यालयात उपवर युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री गुलाबराव गावंडे होते. आरंभी लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचा सत्कार त्यांच्या पत्नी डॉ. अपर्णा पाटील यांनी स्वीकारला. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, महापौर उज्ज्वला देशमुख, उपमहापौर विनोद मापारी, डॉ. विनित हिंगणकर, डॉ. गजानन नारे, सचिन बुरघाटे, शिरीष धोत्रे, डॉ. हर्षवर्धन मालोकार, प्रा. अविनाश बोर्डे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. दादाराव पाथ्रीकर, नगरसेवक पंकज गावंडे, आशीष पवित्रकारसह अन्य उपस्थित होते.

Web Title: Introduction of 575 youths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.