माळी समाजाचे २१ वे राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन
By Admin | Updated: January 9, 2015 01:21 IST2015-01-09T01:21:21+5:302015-01-09T01:21:21+5:30
शेगाव येथे १0, ११ रोजी आयोजन.

माळी समाजाचे २१ वे राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलन
अकोला: माळी समाजाचे २१ वे उपवर युवक-युवती आणि त्यांच्या पालकांचे परिचय महासंमेलन शेगाव येथे शनिवार, १0 जानेवारी व रविवार, ११ जानेवारी रोजी माळी सेवा मंडळ, खामगाव व युग पुरुष महात्मा फुले बहुउद्देशिय प्रतिष्ठान अकोला यांच्या संयुक्त विद्यामाने संपन्न होत आहे. हे संमेलन खामगाव मार्गावरील आदर्श रिसोर्टच्या बाजूला असलेल्या महात्मा फुले मंगल भवनाच्या नियोजित जागेवर होणार आहे.
या राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलनाचे उद्घाटन माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजीव सातव करणार आहेत. याप्रसंगी माजी आमदार कृष्णराव इंगळे, आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार सुधाकरराव गणगणे, तुकाराम बिरकड, जगन्नाथ ढोणे, अशोकराव मानकर, डॉ. शंकरराव क्षिरसागर, प्रा. हरीभाऊ इंगळे, छगनराव मेहत्रे यांच्यासह उद्योजक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवसीय संमेलनात सोयर पुस्तिकेचे विमोचन, युवक-युवती परिचय, पालक परिचय व इतर मार्गदर्शन मान्यवरांद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी ४0 हजार चौरस फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला असून, राज्यातील सर्व स्तरातील युवक-युवती सहभागी होणार आहेत.