पिंजर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅटचे लोकार्पण
By Admin | Updated: February 14, 2015 01:44 IST2015-02-14T01:44:32+5:302015-02-14T01:44:32+5:30
ग्रामीण भागातील खेळाडू व कुस्तीगिरांना अद्ययावत क्रीडा सुविधा देण्याची शासन प्रयत्नशील- क्रिडाधिकारी पाटील.

पिंजर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅटचे लोकार्पण
अकोला: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोलाच्यावतीने भाऊसाहेब लहाने कला महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कुस्ती मॅटचे लोकार्पण जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. लोकार्पण करण्यात आलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची कुस्ती मॅट १२ बाय १२ मीटर कव्हरसह भाऊसाहेब लहाने ज्ञानप्रकाश महाविद्यालय, पिंजर (बाश्रीटाकळी) येथे देण्यात आल्याची घोषणा यावेळी पाटील यांनी केली. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्र, पिंजर या ठिकाणी नियमित स्वरू पात सुरू करण्यात आल्याचेही सांगितले. ग्रामीण भागातील खेळाडू व कुस्तीगिरांना अद्ययावत क्रीडा सुविधा देऊन, त्यांच्या कौशल्यामध्ये वाढ करू न आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही यावेळी पाटील यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. सुबोधचंद्र लहाने, प्राचार्य व्ही.सी.खारोडे, आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. नव्याने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचा लाभ कुस्तीगिरांनी घ्यावा, असे यावेळी मान्यवरांनी सांगितले. नवीन मॅटवर पिंजर येथील कुस्तीगिरांचे प्रदर्शनीय सामने घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. पंकज तायडे यांनी केले. आभार प्रा. नानासाहेब सपकाळ यांनी मानले.