रिदिमा, वैभव व श्रेयशला आंतरराष्ट्रीय मानांकन

By Admin | Updated: December 14, 2014 23:37 IST2014-12-14T23:37:47+5:302014-12-14T23:37:47+5:30

आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत अकोल्यातील खेळाडूंचे उत्कृष्ट प्रदर्शन.

International rating for Ridima, Vaibhav and Shreyash | रिदिमा, वैभव व श्रेयशला आंतरराष्ट्रीय मानांकन

रिदिमा, वैभव व श्रेयशला आंतरराष्ट्रीय मानांकन

अकोला: ब्रिलियंट चेस अकादमीचे खेळाडू रिदीमा चंदन हिला १२६६, वैभव अहिर याला १३९१ व श्रेयश चिंचोले याला ११00 वे आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. अहमदनगर, सांगली, हैदराबाद, नागपूर येथे झालेल्या विविध आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळप्रदर्शन करीत तिघांनीही आंतरराष्ट्रीय मानांकन यादीत स्थान मिळविले.
खेळाडूंच्या या यशाबद्दल अकादमीमध्ये एचडीएफसी बँकेचे शाखाधिकारी नितीन चौधरी यांच्या हस्ते तिघांचाही गौरव करण्यात आला. पुढील वर्षात होणार्‍या राज्य, राष्ट्रीय, आशियाई चॅम्पियनशिप आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेकरिता तिघेही प्रशिक्षक जितेंद्र अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात नियमित सराव करीत आहेत.

Web Title: International rating for Ridima, Vaibhav and Shreyash