अकोल्याच्या साक्षीला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य
By Atul.jaiswal | Updated: July 21, 2018 18:24 IST2018-07-21T18:22:35+5:302018-07-21T18:24:42+5:30
अकोला : सर्बिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय युवा बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रिडा प्रबोधीनीची खेळाडू साक्षी गायधने हिने चमकदार कामगिरी करत देशासाठी कांस्य पदक पटकावले.

अकोल्याच्या साक्षीला आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत कांस्य
अकोला : सर्बिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय युवा बॉक्सिंग स्पर्धेत अकोला क्रिडा प्रबोधीनीची खेळाडू साक्षी गायधने हिने चमकदार कामगिरी करत देशासाठी कांस्य पदक पटकावले. देशांतर्गत स्पर्धा गाजविणाऱ्या साक्षी गायधने हिने आता विदेशातही आपली छाप पाडली आहे.
सर्बिया येथे १० ते १६ जुलै या कालावधीत खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत जगभरातील नावाजलेल्या खेळाडूंनी भाग घेतला. या स्पर्धेत साक्षी गायधने हीने भारतीय संघात महाराष्ट्रातील एकमेव खेळाडू म्हणून प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेत तीने आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत कांस्य पदकाची कमाई केली. या कामगिरीमुळे तीची निवड आॅगस्ट महिन्यात हंगेरी येथे होणार असलेल्या स्पर्धेसाठी भारतीय संघात करण्यात आली आहे.
याआधी साक्षी हिने ६३ व्या राष्ट्रीय स्पर्धे स्वर्ण पदक पटकावले होते. तसेच बँकॉक येथील स्पर्धेतही तीने रजत पदकाची कमाई केली होती. साक्षी सद्या भारतीय संघासोबत आंतरराष्ट्रीय स्पर्धेची तयारी करीत आहे.