शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आंतरविद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धा :  पुणे विद्यापीठाने कोल्हापूर विद्यापीठावर वर्चस्व गाजविले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 3:05 PM

अकोला: चौथ्या फेरीअखेर अग्रमानांकित पुणे विद्यापीठाने ३-५, ०-५ गुणांनी कोल्हापूर विद्यापीठावर वर्चस्व गाजविले.

अकोला: चौथ्या फेरीअखेर अग्रमानांकित पुणे विद्यापीठाने ३-५, ०-५ गुणांनी कोल्हापूर विद्यापीठावर वर्चस्व गाजविले. पहिल्या पटावर ओंकार कायदरने वजिरांची चाल-प्रतिचाल करीत समान स्थिती राखली; मात्र मानांकित निखिल दीक्षितने डावाच्या अंतिम भागात तांत्रिक बुद्धिबळ खेळाचे अनुभवी प्रदर्शन करीत ओंकार कायदरचा पराभव केला. दुसऱ्या पटावर मुंबई विद्यापीठाने गुजरात विद्यापीठावर ३-१ गुणांनी विजय मिळविला.महिला गटात पहिल्या पटावर शिवाजी विद्यापीठाने मुंबई विद्यापीठाला बरोबरीत रोखण्यात यश मिळविले. पौर्णिमा उपळावीकर या कोल्हापूर विद्यापीठाच्या खेळाडूने मानांकित धनश्री पंडितला कडवी लढत दिली; मात्र धनश्रीने काळ्या राजाच्या बाजूला जोरदार हल्ला चढवित पौर्णिमेला काळा हत्ती द्यावयास भाग पाडून आपल्या विद्यापीठाला पराभवाच्या खाईतून बाहेर काढले, तर दुसºया पटावर पुणे विद्यापीठाने सोलापूर विद्यापीठाचा ४-० ने पराभव केला.चौथ्या फेरीअखेर, पुरुष गटात पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाने आघाडी घेतली असून, अमरावती विद्यापीठाने तिसºया क्रमांकावर झेप घेतली आहे.महिला गटात पुणे विद्यापीठ आघाडीवर असून, मुंबई विद्यापीठ, एस.एन.डी.टी. मुंबई विद्यापीठ व शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) दुसºया क्रमांकावर पोहोचले आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने महिला गटात इंदूर विद्यापीठाला बरोबरीत रोखले तर पुरुष संघाला उत्तर महाराष्ट्र संघाकडून कडव्या लढतीअंती हार पत्करावी लागला.पाचव्या फेरीअखेर महिला गटात पुणे विद्यापीठाने मुंबई विद्यापीठावर खळबळजनक विजय नोंदविला. निमिता जोशीने दुसºया पटावर धनश्री पंडितला बरोबरीत रोखले. ईशिका सैनीने अंजली नेमलेकरचा पराभव केला.सहाव्या फेरीत पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठाबरोबर खेळेल, तर नागपूर विद्यापीठ राजस्थान विद्यापीठाबरोबर असेल. महिला गटात अतिशय कडव्या लढतीची अपेक्षा सर्व बुद्धिबळप्रेमी करीत आहेत.पुरुष गटात पुणे विद्यापीठाने पाचव्या फेरीअखेर जोरदार बढत घेतली असून, दुसºया क्रमांकावर गुजरात विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, जबलपूर विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (जळगाव) समान गुणसंख्येवर आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाChessबुद्धीबळ