४५० शिक्षकांच्या विमा हप्त्याचा पुन्हा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 23:30 IST2017-08-26T23:30:26+5:302017-08-26T23:30:26+5:30
बाळापूर पंचायत समितीमधील प्रकार

४५० शिक्षकांच्या विमा हप्त्याचा पुन्हा घोळ
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिक्षकांच्या वेतनातून जीवन विमा निगमच्या हप्त्याच्या रकमेची कपात केल्यानंतरही ती रक्कम भारतीय जीवन विमा कंपनीकडे जमा न करण्याचा प्रकार पुन्हा बाळापूर पंचायत समितीमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे, गेल्यावर्षी फेब्रुवारी २०१६ ते मार्च २०१७ दरम्यानचे हप्ते न भरल्याचेयाच पंचायत समितीमध्ये उघड झाले होते.
कर्मचाºयांच्या वेतनातून दरमहा जीवन विम्याची रक्कम कपात केली जाते. ती कपात केलेली रक्कम भारतीय जीवन विमा कंपनी कार्यालयात त्याचवेळी जमा होेणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्यातील काही पंचायत समित्यांमध्ये ही रक्कम कंपनीकडे जमा करण्यात कमालीची दिरंगाई केली जाते. हाप्रकार बाळापूर, अकोला पंचायत समितीमध्ये सातत्याने घडत आहे. त्याबाबतची तक्रार मार्चमध्ये मु
ख्य कार्यकारी अधिकाºयांकडे करण्यात आली.
त्यावर तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर यांनी चौकशी केली. त्यामध्ये फेब्रुवारी २०१६ ते मार्च २०१७ दरम्यानची विमा हप्त्याची कपात केलेली रक्कम जमाच झाली नसल्याचे स्पष्ट झाले होते.
दरमहा कर्मचाºयांच्या वेतनातून कपात झाल्यानंतरसुद्धा रक्कम विमा कंपनीमध्ये का जमा केली जात नाही, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या अन्यायाविरुद्ध शिक्षक समिती मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे धाव घेण्याच्या तयारीत आहे. पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी या समस्येकडे लक्ष द्यावे, अशी मागणी समितीने केली आहे.
रोखपाल पोहरे यांनी भरली दंडाची रक्कम
गेल्यावर्षी कर्मचाºयांच्या विमा हप्त्याची रक्कम भरण्यास विलंब झाल्याने त्यापोटी विमा कंपनीने पंचायत समितीला दंडासह रक्कम भरण्याचे पत्र दिले होते. त्याचवेळी चौकशीमध्ये जबाबदारी निश्चित झाल्याने पंचायत समितीचे रोखपाल वसंत पोहरे यांनी ती दंडाची रक्कम त्यांच्याजवळून भरली. मात्र, या बेजबाबदारपणाबद्दल पुुढे काहीच कारवाई झाली नसल्याची माहिती आहे.
दोन दिवसांत रक्कम जमा करू!
पंचायत समितीमधील शिक्षकांचे मार्चनंतरचे वेतन मे अखेर झाले होते. त्या काळातील विमा हप्त्याच्या रकमेचा धनादेश कंपनीकडे पाठवला. त्यामध्ये लिखाणात चूक असल्याचे सांगत कंपनीने धनादेश परत केला. ती चूक दुरुस्त करून गटविकास अधिकाºयांच्या स्वाक्षरीने येत्या दोन दिवसांत कंपनीकडे पाठवला जाईल, असे पंचायत समितीचे सहाय्यक लेखाधिकारी ए.एम. साखरकर यांनी
सांगितले.