शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘टीईटी’ उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे निर्देश!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 12:49 IST

शिक्षण संस्थांनी त्यांची सेवा कायम ठेवल्यास, १ जानेवारी २0२0 पासून शासकीय वेतन अनुदान बंद करण्याचा इशारासुद्धा शिक्षण संचालकांनी दिला आहे.

अकोला: फेब्रुवारी २0१३ नंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करण्यास बजावले होते; परंतु शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण केली नाही. अशा जिल्हा परिषद, महापालिका आणि खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक द.गो. जगताप यांनी २४ डिसेंबर रोजी दिले आहेत. विशेष म्हणजे, शिक्षकांची सेवा समाप्त न करणाऱ्या शिक्षण संस्थांचे अनुदानही बंद करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे २0१३ नंतर नियुक्त शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे.आरटीईनुसार राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने २३ आॅगस्ट २0१0 व २९ जुलै २0११ च्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षकांना(इ. पहिली ते आठवी) किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता निश्चित केली आणि शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक केली. राज्य शासनानेसुद्धा १३ फेब्रुवारी २0१३ च्या निर्णयानुसार शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य केली; परंतु राज्यातील तत्कालिन शिक्षणाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाला ठेंगा दाखवित, शिक्षण संस्थांमधील रिक्त पदांवर रूजू करून घेण्यास मान्यता दिली होती. राज्यातील जवळपास आठ हजारावर शिक्षक पदांवर मनपा, जिल्हा परिषद शाळांसोबतच खासगी शिक्षण संस्थांमध्ये रूजू झाले. विशेष म्हणजे, तत्कालिन शिक्षणाधिकाºयांनी त्यांच्या पदांना मान्यता, त्यांना अ‍ॅप्रुव्हलसुद्धा दिले. या सर्व शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने ३१ मार्च २0१९ पर्यंत मुदत दिली होती; परंतु या निर्णयाचा विरोध करीत अनेक शिक्षकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयात गेलेल्या शिक्षकांची सेवासमाप्ती न करता, उर्वरित जिल्हा परिषद, मनपा, खासगी शिक्षण संस्थांमधील टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची तत्काळ सेवा समाप्त करण्यात यावी. शिक्षण संस्थांनी अनुदानित व विनाअनुदानित शिक्षक, कर्मचाºयांची सेवा समाप्तीची कारवाई त्यांच्या स्तरावर करावी. शिक्षण संस्थांनी त्यांची सेवा कायम ठेवल्यास, १ जानेवारी २0२0 पासून शासकीय वेतन अनुदान बंद करण्याचा इशारासुद्धा शिक्षण संचालकांनी दिला आहे. या निर्देेशामुळे २0१३ नंतर नियुक्त शिक्षकांच्या नोकरीवर गंडांतर आले आहे.

शिक्षक नव्हे, शिक्षण विभाग दोषी, शिक्षक संघटनांचा आरोपशासन निर्णय बाजूला सारून तत्कालिन शिक्षणाधिकाºयांनी खासगी शिक्षण संस्थांमधील रिक्त पद भरण्यास मान्यता दिली होती. एवढेच नाही तर वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित जाहिरातींनुसार बेरोजगार शिक्षकांनी आरक्षणानुसार रिक्त पदांसाठी अर्ज केले. मुलाखती दिल्या आणि त्यानंतर त्यांची शाळेमध्ये नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीला तत्कालिन शिक्षणाधिकाºयांनी मंजुरी दिली. त्यामुळे बेरोजगार शिक्षक उमेदवारांना शिक्षण विभागाने अंधारात ठेवून भरती केली. त्यांची सेवा समाप्त करणे हा शिक्षकांवर अन्यायच आहे, असा आरोप राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष मनिष गावंडे यांनी केला आहे.

शिक्षण विभागाने पदांसाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे बेरोजगार उमेदवारांना सांगितले असते. तर त्यांची फसवणुक झाली नसती. परंतु शिक्षणाधिकारी, शिक्षणसंस्थांनी शिक्षक उमेदवारांना अंधारात ठेवले. यात शिक्षण विभाग दोषी आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने शिक्षकांची सेवासमाप्ती करू नये.-डॉ. अविनाश बोर्डे, प्रांताध्यक्ष विज्युक्टा

 

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षक