वीजनिर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:20 IST2021-04-23T04:20:12+5:302021-04-23T04:20:12+5:30
पारस औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत ...

वीजनिर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन उपलब्धतेबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश
पारस औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला गुरुवारी जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, पारस औष्णिक वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल खटारे उपस्थित होते. याच परिसरात असलेल्या प्रकल्प विभागाच्या जागेची ५० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यासाठीही त्यांनी पाहणी केली. या जागेत विद्युतीकरण, लाईट, पंखे, पाण्याची सोय आहे. त्यामुळे या ठिकाणी हॉल मोकळा करून रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्यात आली, तर या जागेचा कोविड केअर सेंटर म्हणून उपयोग करता येईल, त्यासाठी तातडीने स्वच्छता व आवश्यक बाबींची कार्यवाही करावी, अशा सूचनाही ना. कडू यांनी महाजेनकोच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
फोटाे: ईएमएस