शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

संस्थाध्यक्ष, सचिवाने केला प्राध्यापिकेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 11:21 IST

संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे, सचिव हरीश बोचरे यांनी कक्षात बोलावून प्राध्यापिकेला धक्काबुक्की करून विनयभंग केला.

पातूर: येथील महात्मा फुले आर्टस अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमधील एक प्राध्यापिका २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता सहकारी प्राध्यापक व कर्मचाऱ्यांना संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे, सचिव हरीश बोचरे यांनी कक्षात बोलावून एक दिवसाचे वेतन कापल्याबाबत पत्र दिले आणि धक्काबुक्की केली, तसेच प्राध्यापिकेला धक्काबुक्की करून विनयभंग केला. याप्रकरणी पातूर पोलिसांनी मंगळवारी दुपारी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.एका प्राध्यापिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे व सचिव हरीश सुभाष बोचरे हे गत चार ते पाच वर्षांपासून नियमित वेतन देत नाहीत. त्यामुळे कुटुंबाची उपासमार होत आहे. संस्थेने जानेवारी ते जुलै २0२0 महिन्यांचे वेतन दिले नाही, त्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी २८ आॅगस्ट रोजी एक दिवस संपर्क केला. महाविद्यालयाला वेतनासाठी पत्र दिले. त्यानंतरही वेतन न मिळाल्यामुळे सर्वांनी एक दिवस पुन्हा संप केला. प्राध्यापक व कर्मचाºयांचे कोणतेही बिल मंजूर करण्यासाठी अध्यक्ष, सचिव वारंवार पैशांची मागणी करतात. महिला प्राध्यापकांना कक्षात एकटे बोलावून अपशब्द वापरतात. २२ सप्टेंबर रोजी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाºयांना अध्यक्ष व सचिवांनी त्यांच्या कक्षात बोलावले आणि एक दिवसाचे वेतन कपात केल्याचे पत्र दिले. याबाबत त्यांना जाब विचारला असता, त्यांनी प्राचार्य वाठ यांच्यासमोर धक्काबुक्की केली, तसेच एका सहायक प्राध्यापिकेलासुद्धा धक्काबुक्की केली आणि धमकी दिली. अध्यक्ष सुभाष बोचरे व सचिव हरीश बोचरे हे नेहमीच प्राध्यापक व कर्मचाºयांचा मानसिक छळ करतात. शिवीगाळ करून धमक्या देतात, त्यामुळे आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. प्राध्यापिकेच्या तक्रारीनुसार पातूर पोलिसांनी संस्थाध्यक्ष व सचिवाविरुद्ध भादंवि कलम ३५४, ५0४, ५0६ नुसार गुन्हा दाखल केला.प्राध्यापक, कर्मचाºयांच्या तक्रारीची सोमवारी सुनावणी अमरावती विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. केशव तुपे यांच्याकडे महात्मा फुले कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांनी तक्रार करून कर्मचाºयांवर झालेल्या अन्यायाची चौकशी करावी आणि महाविद्यालयात कामकाज चालविण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार डॉ. तुपे यांनी प्राचार्यांना पत्र देत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाºयांवर झालेल्या अन्यायाबाबत २८ सप्टेंबर रोजी दुपारी सुनावणी घेण्यास कळविले आहे.

 

टॅग्स :PaturपातूरCrime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगAkolaअकोला