पास्टूल येथे नुकसान झालेल्या शेतीची महसूल व कृषी विभागाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:18 IST2021-03-26T04:18:35+5:302021-03-26T04:18:35+5:30

पातूर तालुक्यातील पास्टुलसह इतर गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, आंबा, गहू आणि भाजीपाला, केळी, हळद यासह इतर पिकांचे ...

Inspection of damaged farm revenue and agriculture department at Pastul | पास्टूल येथे नुकसान झालेल्या शेतीची महसूल व कृषी विभागाकडून पाहणी

पास्टूल येथे नुकसान झालेल्या शेतीची महसूल व कृषी विभागाकडून पाहणी

पातूर तालुक्यातील पास्टुलसह इतर गावांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे कांदा, आंबा, गहू आणि भाजीपाला, केळी, हळद यासह इतर पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे सर्व्हेक्षण महसूल विभाग व कृषी विभागाकडून करण्यात आले.

सोमवारी व मंगळवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भागातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. त्यामुळे नुकसानाचे सर्व्हेक्षण झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी. अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी केली आहे. सततची नापिकी आणि कर्जबाजारीमुळे कंटाळलेला शेतकरी या गारपिटीने झालेल्या नुकसानामुळे हवालदिल झाला आहे. शासनाने तात्काळ मदत द्यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावेळी महसूल विभागाचे डी.एम. डाबेराव, कृषी विभागाचे डी. एस. निलखन, कृषी मित्र सचिन तायडे, ग्रामसेविका उज्वला गुंडेवार, सरपंच आम्रपाली घुगे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू गीते, उपसरपंच मंगेश केकन, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी गोपाल चतरकर, अलका भीमराव घुगे, लताबाई विजय घुगे, मिनाबाई मंगेश केकन, सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ घुगे आदी उपस्थित होते.

फोटो: मेल फोटोमध्ये

Web Title: Inspection of damaged farm revenue and agriculture department at Pastul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.