बाळापूर येथे आठवडी बाजारात २८३ व्यावसायिकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:19 IST2021-04-04T04:19:37+5:302021-04-04T04:19:37+5:30
उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी कोरोनावर मात करीत २५ दिवसांनंतर प्रथमच बाळापूर ...

बाळापूर येथे आठवडी बाजारात २८३ व्यावसायिकांची तपासणी
उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी कोरोनावर मात करीत २५ दिवसांनंतर प्रथमच बाळापूर शहरात येऊन आठवडी बाजारातून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व्यावसायिकांना कोरोना तपासणी करण्याचे आवाहन केले होते. यासाठी आरोग्य विभागाने आठवडी बाजारातील नगर परिषद सभागृह येथे तपासणी मोहीम राबवली. यास उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांच्या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी जी. एस. पवार उपस्थित होते. शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोना तपासणी व लसीकरण करण्यासाठी तालुका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.