कवठा येथे रेशनकार्डधारकांची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:23 IST2021-07-07T04:23:53+5:302021-07-07T04:23:53+5:30
रेशनकार्डधारकांनी तक्रार केल्यानंतर पुरवठा विभागाने चौकशी केली. मात्र रेशनकार्डधारकांची समाधान झाले नसल्याने हे प्रकरण आयुक्ताकडे दाखल केले होते. त्याप्रकरणी ...

कवठा येथे रेशनकार्डधारकांची चौकशी
रेशनकार्डधारकांनी तक्रार केल्यानंतर पुरवठा विभागाने चौकशी केली. मात्र रेशनकार्डधारकांची समाधान झाले नसल्याने हे प्रकरण आयुक्ताकडे दाखल केले होते. त्याप्रकरणी आयुक्तांनी फेरचौकशी करण्याचे आदेश दिले. त्या आदेशाचे पालन करीत. बाळापूर येथील नायब तसीलदार कौटकार, लोखंडे यांनी कवठा येथे २४ व २५ जूनला येऊन चौकशी केली. यावेळी रेशनकार्डधारक उपस्थित होते. यावेळी पावती न देणे, रेशनकार्ड बनवण्यासाठी आर्थिक मागणी करणे आणि शिवीगाळ करणे अशा तक्रारींचा पाढाच नायब तहसीलदारांसमोर रेशन कार्डधारकांनी वाचून दाखविला. आता या स्वस्त धान्य दुकानदाराविरुद्ध काय कारवाई होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत.
लोहारा येथील पूल खचल्यामुळे वाहतूक वळविली
कवठा : बाळापूर तालुक्यातील लोहारा येथील काही दिवसांपूर्वी पुलाचा काही भाग खचल्यामुळे ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात आली आहे. अकोट-तेल्हाराकडून येणाऱ्या बसगाड्या मनसगावमार्गे वळविण्यात आल्यामुळे प्रवाशांना अतिरिक्त भाडेदर देऊन आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. लोहारा मार्गे जाणारे टॅक्सीधारक जास्तीचे ३० रु. भाडे आकारून प्रवाशांची लुबाडणूक करीत आहेत.