दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरु!

By Admin | Updated: August 18, 2016 02:12 IST2016-08-18T02:12:34+5:302016-08-18T02:12:34+5:30

‘एसडीओं’नी नोंदविले आई-वडील, शिक्षकांचे बयाण.

Inquiries for death of two children started! | दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरु!

दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरु!

अकोला, दि. १७ : आदर्श कॉलनी परिसरात महानगरपालिका शाळा क्रमांक १६ च्या मैदानात शोषखड्डयातील पाण्यात बुडून दोन बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी चौकशी सुरु केली. त्यामध्ये बुधवारी मृतक दोन्ही बालकांचे आई-वडिल, शेजारी आणि शाळेच्या शिक्षकांचे बयाण नोंदविण्यात आले.
अकोला शहरातील आदर्श कॉलनीस्थित मनपा शाळा क्र. १६ च्या मैदानातील शोषखड्डयातील पाण्यात बुडून सिध्दार्थ राजेश घनगावकर आणि कृष्णा राकेश बहेल या दोन बालकांचा गत १४ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. या घटनेची सर्वंकष चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी त्याच दिवशी अकोला उपविभागीय अधिकार्‍यांना दिला होता. त्यानुसार उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी १७ ऑगस्टपासून या प्रकरणाची चौकशी सुरु केली. त्यामध्ये मंगळवारी त्यांनी घटनास्थळाची पाहणी करुन, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे बयाण नोंदविले. त्यानंतर बुधवारी मृतक दोन्ही बालकांचे आई-वडिल, शेजारी असलेल्या कुटुंबातील व्यक्ती आणि दुर्घटनेत मृतक बालकांना शोषखड्डयातील पाण्यातून बाहेर काढलेल्या व्यक्तीचे बयाण नोंदविण्यात आले.

Web Title: Inquiries for death of two children started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.