बालमजूर मृत्यूप्रकरणाची बालकल्याण समितीकडून चौकशी

By Admin | Updated: April 30, 2015 01:54 IST2015-04-30T01:54:32+5:302015-04-30T01:54:32+5:30

जखमी कामगाराचे नोंदविले बयाण.

Inquiries from Child Welfare Committee, Child Welfare Committee | बालमजूर मृत्यूप्रकरणाची बालकल्याण समितीकडून चौकशी

बालमजूर मृत्यूप्रकरणाची बालकल्याण समितीकडून चौकशी

अकोला - एमआयडीसीतील गर्ग अँग्रो इंडस्ट्रिजमध्ये हरभर्‍याच्या पोत्यांच्या ढिगाखाली दबल्याने एक बालमजूर तडफडून मृत्यू पावला, तर दुसरा बालमजूर गंभीर जखमी झाला. या प्रकरणाच्या चौकशीस बालकल्याण समितीने बुधवारी प्रारंभ केला आहे. विकास गर्ग यांच्या एमआयडीसीतील गर्ग अँग्रो इंडस्ट्रिजमध्ये हरभर्‍याच्या पोत्यांच्या ढिगाखाली दबल्याने मध्य प्रदेशातील राकेश दिनकार या बालमजुराचा मृत्यू झाला असून, त्याचाच चुलतभाऊ दिनेश दिनकार हा गंभीर जखमी झाला. यामधील राकेशच्या मृतदेहाची विल्हेवाट परस्परच लावण्यात आली असून, जखमी दिनेशलाही बुधवारी खासगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. प्रकरणाची तक्रार होताच सिव्हिल लाइन पोलिसांनी जखमी दिनेशचे बयाण नोंदविणे आवश्यक होते; मात्र त्यांनी दिनेशचे बयाण नोंदविले नसल्याची माहिती आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी सिव्हिल लाइन पोलिसांनीही विकास गर्ग यांना मदत केल्याचे दिसून येत असल्याचा आरोप बालकल्याण समितीद्वारे करण्यात आला आहे. बालकल्याण समि तीच्या तीन सदस्यी समितीने या प्रकरणाची चौकशी केली असून, यामध्ये अँड. संगीता भाकरे व इतर दोघांचा समावेश आहे.

Web Title: Inquiries from Child Welfare Committee, Child Welfare Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.