शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 14:13 IST

तिघांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वाशिम जिल्ह्यातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान सोमवार, ५ आॅगस्टच्या रात्री मृत्यू झाला.

खेट्री (जि. अकोला) : पैशाच्या देवाण-घेवाणीवरून चान्नी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळखुटा येथे तिघांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या वाशिम जिल्ह्यातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान सोमवार, ५ आॅगस्टच्या रात्री मृत्यू झाला.वाशिम जिल्ह्यातील आसोला येथील रहिवासी हसन खान अशरफ खान ५५, यांची पिंपळखुटा येथे शेती आहे. ते शेती वाहण्यासाठी गेल्या अनेक वषार्पासून पिंपळखुटा येथे राहत होते. पैशाच्या देवाण घेवाण वरून हसन खान अशरफ खान याला पिंपळखुटा येथील तिघांनी ३१ जुलै रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान बेदम मारहाण केली होती. या मारहाणीमध्ये हसन खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन हसन खान यांना आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी नेले असता, हसन खान यांची प्रकृती चिंताजनक असल्याने तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविले होते. तेव्हापासून हसन खान यांच्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीच सुधारणा होत नसल्याने हसन खान यांना त्यांच्या नातेवाईकांनी सोमवार,५ आॅगस्ट रोजी पुढील उपचारासाठी वाशिम कडे नेत असताना, रात्री ११:३० वाजताच्या सुमारास हसन खान यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश झोडगे, यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी मंगळवारी ६ आॅगस्ट रोजी पिंपळखुटा येथे घटनास्थळी भेट देऊन काही जणांचे जबाब नोंदविले असून, चौकशीसाठी पिंपळखुटा येथील एकास ताब्यात घेतले आहे. मृतक हसन खान यांची उत्तरीय तपासणी वाशीम येथे करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तरीय तपासणी अहवाल किंवा मृतकाच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून पुढची भूमिका घेऊन कारवाई करण्यात येईल असे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता, पुढील तपास चान्नी पोलिस करीत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाwashimवाशिमCrime Newsगुन्हेगारी