जखमी कोल्हा घरात शिरला!

By राजेश शेगोकार | Updated: March 1, 2023 17:13 IST2023-03-01T17:13:25+5:302023-03-01T17:13:35+5:30

महापालिका प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या शिवर येथील दत्त नगरातील ओम सागऴे यांच्या घरात २८ फेब्रुवारीला जखमी अवस्थेत कोल्हा शिरल्याने एकच खळबळ उडाली.

Injured fox entered the house! | जखमी कोल्हा घरात शिरला!

जखमी कोल्हा घरात शिरला!

अकोला :

महापालिका प्रभाग क्रमांक १३ अंतर्गत येणाऱ्या शिवर येथील दत्त नगरातील ओम सागऴे यांच्या घरात २८ फेब्रुवारीला जखमी अवस्थेत कोल्हा शिरल्याने एकच खळबळ उडाली.

जखमी काेल्हा घरात शिरल्याची माहिती नागरिकांनी तत्काळ निसर्ग वन्य जीव प्राणी हिताय बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष संतोष वाकोडे यांना दिली. त्यांनी तत्काळ शिवर गाठत सागळे यांच्या घरातील कोल्ह्याला जेरबंद केले. यासाठी त्यांना निसर्ग वन्य जीव प्राणी हिताय बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी राहुल साबऴे, अक्षय चौधरी, कृष्णा मुरुमकार, आदींचे सहकार्य लाभले. काेल्हा जखमी असल्याने डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथील पशुवैद्यकीय विभागात कोल्ह्यावर उपचार करण्यात आले. यानंतर  कोल्हा अकोला वन विभागाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

सायळच्या काट्यांमुळे काेल्हा जखमी
शिवर लगत डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा व विमानतळाचा परिसर असल्याने कोल्हा तसेच सायाळ या वन्यप्राण्यांचा वावर आहे. सायळची शिकार करण्याच्या प्रयत्नात सायळच्या अंगावरील काट्यामुळे कोल्हा जखमी झाला, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

Web Title: Injured fox entered the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.