माहिती कार्यालयातील लिपिक निलंबित

By Admin | Updated: March 9, 2015 02:07 IST2015-03-09T02:07:52+5:302015-03-09T02:07:52+5:30

खामगाव येथील उपजिल्हा माहिती कार्यालयात लेखाविषयक कामकाजात अफरातफर व अनियमितता.

Information clerk suspended in the office | माहिती कार्यालयातील लिपिक निलंबित

माहिती कार्यालयातील लिपिक निलंबित

खामगाव (जि. बुलडाणा) : येथील उपजिल्हा माहिती कार्यालयात लेखाविषयक कामकाजात अफरातफर आणि अनियमितता केल्याप्रकरणी लिपिकास निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे उपजिल्हा माहिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. खामगाव येथील उपजिल्हा माहिती कार्यालयात लिपिक, टंकलेखक म्हणून कार्यरत असलेल्या विकास बाळकृष्ण कुळकर्णी यांनी गेल्या अडीच वर्षांंंपासून रोखवही लिहिली नाही. वैयक्तिक कामासाठी आहरण-संवितरण अधिकार्‍यांच्या बँक खात्यामधून रक्कम काढण्यास जिल्हा माहिती अधिकारी यांना मदत करणे, स्वत:च्या अक्षरात नोटशिट लिहून जिल्हा माहिती अधिकार्‍यांची स्वाक्षरी घेणे, चुकीच्या कामात सर्मथन देणे, शासकीय निधीचा गैरवापर करणे आदी गैरवर्तणुकीचा ठपका ठेवत विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक मोहन राठोड यांनी ३ मार्च रोजी त्यांना निलंबित केले. हा आदेश अंमलात असेल एवढय़ा कालावधीत विकास कुळकर्णी यांचे मुख्यालय खामगाव येथेच राहणार आहे तसेच त्यांना जिल्हा माहिती अधिकारी बुलडाणा यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही, असे याबाबत दिलेल्या निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे. एकूणच त्यांच्या निलंबनामुळे शासकीय कार्यालयांमध्ये खळबळ उडाली आहे.

Web Title: Information clerk suspended in the office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.